विविध प्रकारच्या हस्तकलेचे तसेच कपडयापासून बनविलेल्या वस्तूंचा दस्तकार नॅच्चुरा उत्सवाला ” म्हापसा गांधी चौकासमोरील म्हापसा रेसिडेन्सी सभागृहात प्रारंभ झाला आहे हे प्रदर्शन १३ मार्चपर्यत दिवसभर लोकांसाठी खुले राहणार आहे.
यात देशभरातून सहभागी झालेल्या विविध कारागीरांनी बनविलेल्या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. बनारसी साडया , लखनऊ चिकन कारागिरी, कांता सिल्क साडी, काॅटन साडया, बहलपूर सिल्क, चंधक सिल्क, डेॣस मटेरियल, बेडशीट, सोफा कवर, सिल्क कुशन, कुर्ता, शर्ट याचा त्यात समावेश आहे. तसेच ओडिशा राज्यातील विविध प्रकारच्या साडया, कलाकृतीही प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत
वारसा लाभलेल्या विविध वस्तू, विविध प्रकारची ज्येलरी, बांगड्या, याचाही त्यात समावेश आहे. वेगवेगळ्या धातूपासून तयार केलेल्या देव देवताचा आकर्षक मूर्ती प्रदर्शनात लक्ष वेधून घेणारा ठरला आहेत. लहानपणापासून ते ज्येष्ठापासून प्रत्येकाची गरज भागवणारी वस्तू येथे उपलब्ध केली आहे. लहान मुलांसाठी लाकडाची खेळणी सुद्धा कमी किंमतीत उपलब्ध आहेत.