बंदराची मर्यादा नाकारून भाजपचा गोवा विकण्याचा डाव: कॉंग्रेस

.

 

पणजी: गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनमधील बंदर मर्यादा हटवण्याची विनंती फेटाळण्याच्या एनसीझेडएमएच्या कृत्याचा निषेध करत काँग्रेसने बुधवारी आरोप केला की भाजप सरकार गोव्याचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे.

बंदर मर्यादांमध्ये राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार बळकावण्याची क्षमता आहे हे माहीत असूनही, भाजपने गोवा राज्य भांडवलदारांना विकण्याचा प्रयत्न चालूच ठेवल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.

काँग्रेसचे प्रवक्ते ओलेंसियो सिमोयस यांच्यासह प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष ॲल्विस गोम्स, संशोधन विभागाचे अध्यक्ष अविनाश तावारीस, कॅप्टन विरियटो फर्नांडिस, ऑर्विल दुरादो, जेसन सिल्वेरा, रामिरो मास्कारेन्हास आणि सिद्धार्थ कारापूरकर यांनी बुधवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारच्या कृत्याचा निषेध केला.

सिमोयस म्हणाले की काँग्रेस पक्ष बंदर मर्यादा नाकारल्याचा आणि सीझेडएमपीमध्ये वाळूच्या ढिगाऱ्यांचा समावेश न केल्याचा निषेध करतो. “फक्त गोवा बंदराच्या मर्यादेखाली का आहे?” पर्यावरणाचा ऱ्हास करून सागरमाला प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे का”, असा प्रश्न त्यांनी केला.

“गोव्याला वाळूच्या ढिगाऱ्यांमुळे सुंदर किनारपट्टी लाभली आहे. इतर कोणत्याही राज्यात असे वाळूचे ढिगारे नाहीत. आमची उपजीविका आणि पर्यटन किनारपट्टीवर अवलंबून आहे. पण भाजप सर्व काही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.” असे सिमोयस म्हणाले.

“आम्ही गोवा सरकार आणि केंद्र सरकारला इशारा देतो की गोव्याचे सौंदर्य नष्ट करू नका. मुख्यमंत्री प्रमोद सावंत या विषयावर गप्प का आहेत.” असा प्रश्न त्यांनी केला.

ॲल्विस गोम्स म्हणाले की, किनारपट्टीच्या क्षेत्रावर राज्य सरकारचा कोणताही अधिकार राहणार नाही. ‘भाजपने राज्याच्या अधिकारांवर गदा आणली आहे. आता किनारपट्टी भागात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांना मुरगाव बंदर प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.” असे ते म्हणाले.

ॲल्विस गोम्स यांनी काँग्रेसचे सरकार आल्यानंतर जनतेला न्याय देण्याचे आश्वासन दिले. “पणजीतील फेरी रॅम्पजवळचा भागावरही कब्जा करण्यात आला आहे. या परिस्थितीत, खराब हवामानात फेरी वाहून गेल्यास बचाव कार्य कसे केले जाईल.” असा प्रश्न त्यांनी केला आणि भाजप सरकार राज्य भांडवलदारांना कसे विकण्याचा प्रयत्न करीत आहे ते निदर्शनास आणून दिले.

कॅप्टन विरियटो फर्नांडिस म्हणाले की, भाजप गोव्याची किनारपट्टी संपवण्याचा कट रचत आहे. “आम्ही न्याय मिळेपर्यंत लढा देऊ. भाजप भांडवलदारांचा गुलाम झाला आहे आणि गोव्यात कोळसा आणण्याचा प्रयत्न करीत आहे.” असे ते म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar