गृह आधारच्या लाभार्थी गेल्या दहा महिन्यापासून मानधनापासून वंचित

.

 

गृह आधार योजनेच्या लाभार्थीना गेल्या दहा महिन्यापासून मानधन न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबाना आर्थिक आधार मिळावा म्हणून माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहिणींना सुरवातीला दरमहा 1200/ मानधन देण्यास सुरवात केली, त्यात नंतर वाढ करून मानधनाची रक्कम 1500/- करण्यात आली होती.

या योजनेचा लाभ काही उच्च उत्पन्न गटातील लोक घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने सर्वेक्षण करण्याचे काम खाजगी कंपनीस दिले, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी घरोघरी भेट देऊन पहाणी न करता पत्ता सापडत नसल्याचे तसेच अस्तित्वात नसल्याचा शेरा मारला. त्यामुळे बऱ्याच लाभार्थीचे मानधन रखडले. जिवंत असल्याचा दाखला देऊनही मानधन येत नसल्याचे कळाल्यानंतर महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयात चौकशी केली असता सदर कारण देऊन शेरा मारल्याचे सांगण्यात आले व पुन्हा स्थानिक अंगणवाडी सेविकेला भेटून त्यांचा अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले, व राहिलेले मानधन एकत्रित रित्या देण्यात येईल असेही सांगण्यात आले.
दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीपुर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनास ही बाब काही जणांनी आणून दिल्यानंतर त्यांनी सर्व लाभार्थीच्या खात्यात डिसेंबर 2021 पर्यत सर्व रक्कम जमा होईल असे त्यांनी आश्वासन दिले होते, परंतु फेब्रुवारी 2022 संपत आला तरी गृह आधार लाभार्थीच्या खात्यात एक रुपया सुद्धा जमा करण्यात आला नसल्याचे काही गृहिनींनी सांगितले.
2022 च्या निवडणुकीत भाजपा सह काही पक्षानी मानधनात भरीव वाढ करण्याचे आश्वासन दिले, त्यात वाढ मिळेल की नाही हा पुढचा प्रश्न पण सद्या असलेले मानधन तरी पुर्ण द्यावे अशी मागणी गृहिणी वर्गाकडून करण्यात येत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar