मिळालेल्या माहितीनुसार शापोरा येथील बाजारात अंतर्गत असलेल्या एका बार च्या बाहेर च्या बाजूला फस्किन हा दुपारी दारू पिण्यास बसला होता. मालक दुपारी बार बंद करून घरी गेला व सायंकाळी पुन्हा बारवर आला असता फस्किन हा बसलेल्या जागेवर कलंडलेला आढळला. 108 ला पाचारण केल्यावर त्यांनी मृत घोषित केले. त्यानंतर हणजूण पोलिसांना कळवण्यात आले. उपनिरीक्षक फ्रान्सीस झेवियर यांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण शवचिकित्सा केल्यानंतर समजेल असे निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सांगितले.