महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन*

.

_*सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक*_

*
*महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन*

पणजी, २७ फेब्रुवारी ‘महाशिवरात्री’ला शिवतत्त्व नेहमीच्या तुलनेत सहस्त्र पटीने कार्यरत असते. यामुळे उपासकाला आध्यात्मिक स्त्रावर अधिक लाभ होतो. या अनुषंगाने शिवाच्या उपासनेसह विविध विषयांवर भाविकांना शास्त्रीय माहिती मिळावी आणि राष्ट्र, धर्म, आयुर्वेद, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथसंपदेचा लाभ व्हावा यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने १ मार्चला सनातन संस्थेच्या वतीने देशातील अनेक राज्यांत विशेष ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात येणार आहेत. गोव्यात एकूण २८ ठिकाणी या ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कारोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनकीय नियमांचे पालन करून, आपल्या भागातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शन कक्षांना भेट देऊन भगवान शिव, तसेच अन्य विविध विषयांवरील धर्मशास्त्रीय माहिती जाणून घ्या आणि महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळवा’, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या निमित्ताने अध्यात्म, धर्म, आयुर्वेद, राष्ट्ररक्षण आदी अनेक विषयांवरील ग्रंथ सनातन संस्थेच्या www.SanatanShop.com या संकेस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध आहेत, असेही सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ग्रंथ कक्ष लावण्यात येणारी काही महत्त्वाची ठिकाणी आणि वेळा पुढीलप्रमाणे आहेत. श्री रूद्रेश्‍वर देवस्थान, हरवळे (सकाळी ९ ते रात्री ८); श्री सप्तकोटेश्‍वर मंदिर, नार्वे, डिचोली (सकाळी ८ ते रात्री ७); श्री मुळवीर देवस्थान, मालपे, पेडणे (सकाळी ९ ते सायंकाळी ६); श्री दामोदर मंदिर, वास्को (सकाळी ९ ते सायंकाळी ६); श्री दुबळो महादेव मंदिर, सीमेपाईण, मंगेशी (सकाळी ८ ते सायंकाळी ८); श्री दामोदर लिंग, फातोर्डा, मडगाव (सकाळी ९ ते सायंकाळी ७); श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा (सकाळी ९ ते रात्री ९); श्री कपिलेश्‍वर देवस्थान, कपिलेश्‍वरी (सकाळी ७.३० ते रात्री ७.३०); स्वामी समर्थ मठ, शिवोली (सकाळी ८ ते रात्री ९); श्री महादेव शांतादुर्गा मंदिर, मासोडे, वाळपई (सकाळी ९.३० ते ५); श्री महालक्ष्मी मंदिर, पणजी, (सकाळी ७ ते सायंकाळी ६.३०); श्री गोमंतेश्‍वर मंदिर, श्री क्षेत्र ब्रह्मपुरी, जुने गोवा (सकाळी ६.३० ते सायंकाळी ६). या कक्षावर ग्रंथसंपदेसह गोमूत्र अर्क, जपमाळ, अगरबत्ती, भीमसेनी कापूर, अत्तर आदी पूजोपयोगी सात्त्विक उत्पादनेही मिळतील. याविषयीच्या अधिक माहितीसाठी ९३७०९ ५८१३२ या भ्रमणभाष क्रमांकावर अवश्य संपर्क करावा

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar