श्री शांता विद्यालयात मराठी दिन साजरा

.

 

ज्या माय मराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले, जिने या बहुआयामी जगात स्वत:ला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली , आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली, अशा या मराठी भाषेचा गौरव दिन ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लाभलेले, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे श्री. भरत बेतकीकर यांनी केले
विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री शांता विद्यालयामध्ये मराठी दिन साजरा करण्यात आला यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

तसेच या कार्यक्रमाला शाळेचे व्यवस्थापक श्री. शिवाजी पाटील उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापिका सौ प्रजिता सांगाळे, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीगण हजर होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
मुख्याध्यापिकांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व शब्द सुमनांनी स्वागत केले.
मातृभाषेचे आपल्या जीवनामध्ये असलेले अनन्यसाधारण महत्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले .

या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये कविता तयार करणे व सादरीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस
कुमारी रिद्धी नाईक गोल्तेकर हिला मिळाले व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कुमारी राणी झाॅ हिला मिळाले व तृतीय क्रमांकाचे बक्षीस कुमारी उज्वला शेळके व कुमार शाश्वत दुबे यांना मिळाले विद्यार्थ्यांनी सुंदर व प्रेरणादायी कविता सादर केल्या . तसेच मराठी साहित्यिकांवर आधारित भिंतीपत्रक तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेमध्ये कुमारी लक्ष्मी पंडीत हिला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले , कु.आफ्रीन खान हिला दुसर्‍या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आणि कुमारी कोमल पंडित व प्रियंका कारभारी यांना तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले
शिक्षक श्री नवनाथ सावंत , श्री विश्वास सांगळे, यांनी बोधात्मक व मार्मिक अशा कविता सादर केल्या.
शिक्षक श्री.उमेश महालकर यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवनप्रहवाबद्दल माहिती सांगितली .

तसेच मातृभाषेचे महत्त्व सांगणारी नाटिका इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. शिक्षक श्री.संगम चोडणकर यांनी कुसुमाग्रज यांची उत्कृष्ट अशी निर्मिती असलेले नटसम्राट या पुस्तकामधील एक नाट्यछटा सादर केली. व शिक्षक वर्गाने मराठीचे अभिमान गीत या वेळी सादर केले. त्याच प्रकारे प्राथमिक विभागातील विद्यार्थी कु.गौतमी पुजारी ,मनुश्री गोलतेकर, शर्वाणी पेडणेकर ,अखिल लंगोटे , फिजा बाजेवाला यांनी मराठी बडबड गीत सादर केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ विषया आमणेकर गावस यांनी केले तर आभार प्रकटन शिक्षिका आरती गावस यांनी केले.
विद्यार्थी कुमार जावेद शहा यांनी हीच आमुची प्रार्थना हे गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar