साळीगाव पोलिसांच्या नवीन इमारतीचे पोलिस महानिरीक्षक इंद्रदेव शुक्ल व इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले

.

म्हापसा दि.28 ( प्रतिनिधी )

साळीगाव पोलीस ठाण्याला अनेक वर्षांनंतर ही नवीन इमारत मिळाली असून यापूर्वी साळगाव पोलीस स्थानक कळंगुट पोलीस स्थानकाच्या इमारतीतच कार्यरत होते.
पिळर्ण औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या इमारतीच्या परिसरात साळीगाव पोलिस स्थानकाची स्थापना करण्यात आली असून, यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र पोलिस इमारतीची स्थानिकांची मागणी पूर्ण झाली आहे.
यावेळी बोलताना महानिरीक्षक इंद्रदेव शुक्ला म्हणाले की हा परिसर नवीन नसून सध्याची जी जागा आहे जी पोलीस स्टेशन चालविण्यासाठी विद्युत विभागाने दिलेली आहे आणि ही जागा दिल्याबद्दल त्यांनी विद्युत विभागाचे आभार मानले.
नेरूल आणि साळगाव दरम्यान फारशी लोकसंख्या नव्हती आणि औद्योगिक वसाहत येऊनही उद्योगधंदे वाढले होते आणि आता हे पोलिस ठाणे आल्याने सुरक्षिततेची भावना आवश्यक असलेला हा परिसर व्यापला जाईल असे शुक्ला यांनी सांगितले.
हळू हळू पोलीस दलात चांगले मनुष्यबळ वाढत आहे, गोवा पोलीस दिवस रात्र लोकांच्या सेवेस असून पोलीस मित्र वाटावे असा संबंध वाढवण्यात येणार आहे असेही महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar