म्हापसा दि.26 ( प्रतिनिधी )
करोना महामारीची तीव्रता कमी झाल्याने तसेच दोन्ही डोस घेतलेले पर्यटक गोव्यात येऊनही त्यांना संगीताच्या कार्यक्रमाचा अर्थात किनाऱ्यावरील हॉटेल, पब व शॅक्स मधून वाजणाऱ्या रेव्हपार्ट्याचा आनंद घेतायावा म्हणून पार्ट्या आयोजित करण्याची स्पर्धा लागली आहे.
येथील अश्या व्यवसायिकाना प्रतीक्षा आहे ती आचारसंहिता काळ संपण्याची, कारण आचारसंहिता संपल्याबरोबर दुसऱ्या दिवसापासून दि.11 पासून संगीताचे कार्यक्रम अर्थात रेव्ह पार्टी आयोजकांनी ठीकठिकाणी नाक्यावर रेव्हपार्टी आयोजनाचे बॅनर्स लावून पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान हणजूण वागातोर येथील काही पब- रेस्टॉरंट हणजूण पोलिसांच्या व अबकारी खात्याच्या आशिर्वादामुळे रात्रभर सुरू असतात, आचारसंहिता सुरू असतानाही सुरू राहिल्याने स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यातील काही रेस्टॉरंट बिगर गोमंतकीयकांनी चालवण्यास घेतली असून त्यांनी सर्वांना मॅनेज केल्याचे बोलले जाते. वागातोर येथील अश्याच एका रेस्टॉरंट मध्ये नायजेरियन व युगांडाच्या महिला गिऱ्हाईकांच्या प्रतीक्षेत बसलेल्या असतात ( यातील काही महिलांना निवडणूक आचारसंहिता लागल्यावर बदली झालेल्या निरीक्षकाने वैध कागदपत्राशिवाय बेकायदा वास्तव्य प्रकरणी ताब्यात घेतले होते.) मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात एका उपनिरीक्षकाने या ठिकाणी धाड टाकून येथे काम करणाऱ्या काही जणांचे मोबाईल जप्त करून नेले पण या मतदार संघातील एका युवा नेत्याने त्वरित पोलीस स्थानकात धाव घेतली आणी पोलिसांकडील मोबाईल घेऊन ते पुन्हा त्या रेस्टॉरंट चालकांना परत करून आपला दबदबा दाखवला.