_हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अस्नोडा येथे ‘हिंदु संस्कृती आणि महाशिवरात्री’ या विषयावर प्रवचन_ *भीषण काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक

.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक

दिनांक : ०२.०३.२०२२

_हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अस्नोडा येथे ‘हिंदु संस्कृती आणि महाशिवरात्री’ या विषयावर प्रवचन_

*भीषण काळाला तोंड देण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती*

डिचोली, २ मार्च – नाडीभविष्य सांगणार्‍या अनेकांनी, तसेच द्रष्ट्या साधुसंतांनी ‘हळूहळू तिसर्‍या महायुद्धला आरंभ होणार आहे’, असे म्हटले आहे. या भीषण काळात सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर पूर्वसिद्धता करणे अत्याविश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री महेश्‍वर देवस्थान, कैलासनगर, अस्नोडा येथे ‘हिंदु संस्कृती आणि महाशिवरात्र’ या विषयावर आयोजित व्याख्यानात सौ. शुभा सावंत बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘भीषण आपत्काळामध्ये इंधनाचा तुटवडा; खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा तुटवडा; डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदींची अनुपलब्धता असणे आदींचा प्रत्येकाला सामाना करावा लागणार आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून घरच्याघरी पारंपरिक औषधांसाठी वनस्पती, झाडे, घरी लागणारा भाजीपाला किंवा धान्य आदींची लागवड करणे, आदी करावे लागणार आहे. आपल्या कुटुंबाचे कठीण काळात रक्षण कसे करता येईल याविषयी हिंदु जनजागृती समिती प्रथमोपचार प्रशिक्षण, स्वरक्षण प्रशिक्षण, धर्मशिक्षण वर्ग आदीं विनामूल्य वर्ग ‘ऑनलाईन’ स्वरूपात घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर लक्ष टाकल्यास आपणास लक्षात येईल की, महाराजांनी लहान वयातच शत्रूच्या सैनिकांच्या तुलनेन अवघ्या मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराजाची स्थापना केली. जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांवर कोणते संस्कार केले ? हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आपण आपल्या पाल्यांना कोणते संस्कार देतो याचे आत्मपरिक्षण प्रत्येक पालकांनी केले पाहिजे. हिंदूंनी धर्माबद्दल अभिमान राहिलेला नसल्याने आजकाल कुणीही उठतो आणि हिंदु धर्मावर टीकाटीपणी करण्यास धजावतो; मात्र इतर धर्मियांमध्ये एखादे धर्माच्या विरोधात कृत्य घडल्यास त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उमटत असतांना आपण पहातो.’’ सौ. शुभा सावंत यांनी प्रवचनाच्या प्रारंभी महाशिवरात्रीच्या निमत्ताने शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?, शिवाला बेल वाहाण्याच्या पद्धतींमागील अध्यात्मशास्त्र, आदींविषयी माहिती दिली. कार्यक्रमात स्वागत व सूत्रसंचालन सौ. सोनम शिरोडकर यांनी केले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar