हिमालया वेलनेस कंपनी या भारतातील आघाडीच्या वेलनेस ब्रॅण्ड्सपैकी एका ब्रॅण्डने आपले नवीन अभियान सर्वांपुढे आणले आहे. हिमालया मेन पिम्पल क्लीअर नीम फेस वॉश हे निसर्ग व विज्ञान यांची शक्ती असलेले उत्पादन पुरुषांमधील मुरुमांवर सर्वांत प्रभावी कसे आहे हे यात दाखवण्यात आले आहे.
“लडकों के पिम्पल्स का सही सोल्युशन” या घोषवाक्याद्वारे, कोणत्याही अर्धवट सूचनांवरून प्रयोग न करता, मुरुमांच्या समस्येवर योग्य उपाय निवडण्याचा सल्ला हे अभियान तरुण मुलांना देते.
जाहिरातीच्या सुरुवातीला मित्रांचा एक ग्रुप क्रिकेट मॅचनंतर ड्रेसिंग रूममध्ये परत येताना दिसतो, त्यातील एका मुलाला मुरूम आलेले असतात. मॅच सुरू असताना एक मुलगी त्याच्याकडे बघत होती असे सांगून त्याचा एक मित्र त्याची खेळकरपणे चेष्टा करत असतो आणि तो मुलगा म्हणतो की, ती त्याच्याकडे नाही, तर त्याच्या मुरुमांकडे बघत होती. तो चिंतेने आरशात बघू लागतो. त्याचे मित्र त्याच्याजवळ जातात आणि त्याला अनेक सूचना करू लागतात, साबण लावण्याचा आणि मुरुमे फोडण्याचा सल्ला त्याला मिळतो. तेव्हा रिषभ पंत त्या घोळक्यात सामील होतो आणि त्या मुलांना सांगतो की, पुरुषांच्या मुरुमांसाठी केवळ एकच योग्य उपाय आहे. मग तो हिमालया मेन पिंपल क्लीअर नीम फेस वॉश सर्वांना दाखवतो. हा फेस वॉश खास पुरुषांच्या त्वचेसाठी तयार करण्यात आला आहे आणि मुरुमांचे प्रभावीरित्या व्यवस्थापन करतो, असे तो सांगतो.
हिमालया वेलनेस कंपनीचे महाव्यवस्थापक- मार्केटिंग राहुल पांचाळ म्हणाले, “हिमालयाच्या प्रत्येक उत्पादनाचे उद्दिष्ट ग्राहकांची दैनंदिन पर्सनल केअर समस्या सोडवणे हे आहे आणि हाच दृष्टीकोन ब्रॅण्डच्या प्रत्येक घरात स्वास्थ्य आणण्याच्या तसेच प्रत्येक हृदयात आनंद आणण्याच्या तत्त्वात सामावलेला आहे. आम्ही सातत्याने करत असलेल्या ग्राहक अभ्यासात असे लक्षात आले की, मुलांनाही मुरुमं अजिबात आवडत नाहीत आणि ते मुरुमांवरील उपायांबाबत अनेक प्रयोग करतात. म्हणूनच हिमालया मेनचे नवीन अभियान मुरुमांच्या समस्येवर मात करण्याबाबतचे अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि उत्पादनाला ‘लडकों के पिम्पल्स का सही सोल्युशन’ म्हणून प्रस्थापित करत आहे.”
हिमालया वेलनेस कंपनीचे कॅटेगरी व्यवस्थापक अभिनव चुघ म्हणाले, “आमच्या नवीन अभियानाद्वारे आम्ही टीन एजमध्ये मुरुमांचा सामना करणाऱ्या तरुण मुलांशी बोलत आहोत. या वयाला मुले त्यांच्या दिसण्याबद्दल जागरूक होतात, विशेषत: त्यांना एखादी मुलगी आवडू लागते, तेव्हा जास्तच सावध होतात. या अभियानाच्या माध्यमातून तरुण मुलांना मुरुमांवर योग्य उपाय निवडणे कसे आवश्यक आहे हे पटवून देण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. आमचा ब्रॅण्ड अँबॅसडर रिषभ पंत या तरुण मुलांसाठी योग्य तो प्रभाव साधणारा आहे, गैरसमज दूर करून योग्य उपाय निवडण्याचे महत्त्व तो पटवून देतो.”
“हिमालया मेनशी या अभियानाद्वारे जोडून घेता आले याचा मला आनंद आहे. विशेषत: तरुण मुलांमध्ये, त्वचेची प्रत्यक्ष काळजी घेण्याऐवजी पारंपरिक पर्याय वापरणे थांबवण्याचे उद्दिष्ट या अभियानापुढे आहे. हिमालया मेनने टीव्ही जाहिरातींचा वापर व्यासपीठासारखा करून योग्य दिशेने पाऊल उचलले आहे. त्वचेची काळजी घेण्याच्या योग्य पद्धतींबद्दल तरुण मुलांना अधिक ज्ञान पुरवणारा संदेश याद्वारे पसरवला जाऊ शकतो,” असे रिषभ पंत सांगतो.
अलीकडील काही वर्षांत, तरुण मुले ग्रूमिंगबद्दल खूपच जागरूक झाली आहेत. त्यांना मुरुमं दूर करून चांगले दिसायचे आहे पण त्यासाठी उपाय कोणता हे त्यांना माहीत नाही. ते सल्ल्यासाठी केवळ त्यांच्या मित्रांकडे बघू शकतात आणि मित्र तेवढेच अज्ञानी आहेत. हे अभियान म्हणजे पुरुषांच्या ग्रूमिंगकडे बघण्याचा नवीन व वास्तववादी दृष्टिकोन आहे. सेलेब्रिटीचा (रिषभ पंत) उपयोगही प्रभावीपणे करून घेण्यात आला आहे,” असे चॅप्टरफाइव्ह ब्रॅण्ड सोल्युशन्सचे सहसंस्थापक प्रतीक श्रीवास्तव म्हणता.
हिमालया वेलनेस कंपनी या भारतातील आघाडीच्या वेलनेस ब्रॅण्ड्सपैकी एका ब्रॅण्डने आपले नवीन अभियान सर्वांपुढे आणले आहे
.
[ays_slider id=1]