हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रातील प्रभागामध्येही मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले असून या फेरबदलाबद्दल संभाव्य इच्छुकाबरोबरच ग्रामस्थही नाराजी व्यक्त करीत आहेत. या प्रभाग फेरबदलामागे प्रस्थापितांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अकरा प्रभाग असलेल्या या पंचायतीच्या काही प्रभागात लहान मोठे बदल करण्यात आले आहेत पण सर्वात मोठा बदल प्रभाग क्र. आठ व नऊ मध्ये करण्यात आल्याची माहिती प्रभाग क्र.8 मधील ग्रामस्थ थॉमस फर्नांडिस यांनी दिली. नवीन फेर रचनेनुसार त्यांच्या प्रभागातील पन्नास घरे वगळून ती प्रभाग नऊ मध्ये जोडण्यात आली असून हा अन्याय मुद्दामहून करण्यात आल्याचा आरोप थॉमस यांनी केला. या प्रकारबद्दल आपण मामलेदार कार्यालयात व निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रातील प्रभागामध्येही मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले असून या फेरबदलाबद्दल संभाव्य इच्छुकाबरोबरच ग्रामस्थही नाराजी व्यक्त करीत आहेत
.
[ays_slider id=1]