नाण्याची दुसरी बाजू..

.

नाण्याची दुसरी बाजू..

,,,,, ने मजसी ने परत मातृभूमीला…. हे वीर सावरकर यांचे गीत या युद्धकाळात अनेकांना आठवत आहे
युक्रेन आणि रशिया मधे धमासान युद्ध सुरू आहे .
युद्ध कोणत्याही देशासाठी उध्वस्त करणारेच असते.

तिथे शिक्षणा साठी गेलेल्या विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत .
माणुसकीच्या भावनेतून विचार करता त्यात न पटण्या सारखं काही नाही.

मुद्दा हा आहे की केवळ *” स्वतः” च्या भल्यासाठी गेलेल्या विध्यार्थ्यांना संकट आलं की मायभूमी ची आठवण येते.*
यातले किती जण पदवी मिळाली की परत येऊ, या विचाराने जातात.?
आपल्या देशासाठी सेवा देऊ या उदात्त हेतूने गेलेले असतात.
उलट तिथे बस्तान बसलं की भारत देश कसा भ्रष्ट आहे, कसा तांत्रिक दृष्ट्या मागासलेला आहे, किती गरिबी आहे, किती अस्वछता आहे …. अशी भली मोठी यादी होईल इतकी नावं ठेवण्यात फु शा रकी मारत असतात.
त्या देशाचे गोडवे गाताना यांचं तोंड दुखत नाही.
त्यांचे पालक देखील लाखो रुपये खर्चून परदेशी शिक्षणासाठी पाठवतात .
स्वार्था पलीकडे त्यात कसला ही हेतू नसतो .
आणि संकट आल्यावर मात्र मायभूमी आठवते .
कडक्याच्या थंडीत, पंचवीस मैल पायपीट करत, उपाशी पोटी,मरणाच्या भीतीने अडकलेल्या विदयार्थ्यांची सुटका करण्यासाठी मीडिया तर एका मागून एक भावनेच्या लाटेचे तडाखे सामान्यांना देत असतो.
यांना आणण्याची जबाबदारी सरकारची कशी, आणि तीही सरकारी खर्चाने याची breaking news बनवत असतो.
जरा विचार करा , उणे पंधरा तापमानात, किलो, किलो चं वजन पाठीवर घेऊन, पायाची कातडी सोलवटून निघे पर्यंत
पायपीट करत, जीवावर उदार होऊन शत्रूशी सामना करणाऱ्या जवानांचा कधीतरी यांच्या मनात विचार येतो का?
आणि हे सगळं ते जवान देशसेवा म्हणून करतात .
त्यांचे पालक धीराने त्याला तोंड देत असतात.
युद्ध सुरू झालंय आमच्या मुलाला परत पाठवा म्हणून गळे नाही काढत .
अशा पराक्रमी सैनिकांचा विमानतळावर हार तुरे घालून सत्कार करताना कोणी पाहिलंय का हो?
यशस्वी कारवाई करून आल्यावर प्रत्येक जवानाला ओवाळण्यासाठी कोणी पुढे आलेलं पाहिलंय का.?
कर्तव्य बजावणारा उपेक्षित, 😪 तुम्हाला विचारून जातात का हे परदेशी?
मानवतेच्या, भावनेचं भांडवल करायची काही गरज नाही.
देशाने मदत करणं समजू शकतो .
पण मग , *परदेशी शिक्षण घ्यायला जाणाऱ्या प्रत्येक विध्यार्थ्यां कडून परतीच्या तिकिटा एवढी किमान रक्कम सक्तीने आपत्कालीन fund म्हणून जमा करून घ्यावी*.(
इथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना दोन वर्षाचा bond लिहून द्यावा लागतो.)
हीच परिस्थिती corona काळात वूहान मधे अडकलेल्या विध्यार्थ्यांच्या वेळी झाली होती.
जगात ल्या कानकोपऱ्यात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्या साठी जीवाचं रान
केलं गेलं. तेही कोरोनाच्या जीवघेण्या संकटाशी देश एका बाजूला झुंजत असताना.
भारत असा एकमेव देश होता ज्याने बहुतांश लोकांना मोफत आणले .
दुर्देवाची गोष्ट अशी आहे की आता परिस्थिती निवळल्यावर त्यातले कित्येक परत परदेशी निघून गेले असतील त्यापैकी किती जणांच्या मनात या विषयी कृतज्ञता कायम आहे की आपत्काळातच फक्त आपल्या मातृभूमीचे स्मरण होते ? हाही एक मोठा प्रश्न आहे

म्हणून कितीही कळवळा आला तरी हे जे सगळं चाललंय त्याची दुसरी बाजू लक्षात घेतल्यास कधी कधी त्याने संताप होतोच .

शेवटी नाण्याच्या दोन्ही बाजू बघूनच त्याचे मूल्य ठरते

..जयेश थळी

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें