गणपत पार्सेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल, गोवा येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला

.

कार्यक्रम दोन सत्रांत पार पाडला. पहिले सत्र प्रदर्शन दालन उद्घाटन समारंभ तर दुसरे सत्र मराठी भाषा गौरव दिन या विषयावर श्री. परेश वासुदेव प्रभू, संपादक नवप्रभा दैनिक गोवा यांचे व्याख्यान झाले.
पहिल्या सत्रासाठी उद्घाटक म्हणून श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर सर लाभले. तसेच प्रमुख उपस्थिती प्राचार्य श्री. उदेश नाटेकर सर, मराठी विभाग प्रमुख डॉ. गीता येर्लेकर लाभल्या. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुुरवात झाली. प्रारंभी महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिव्या बर्वे यांनी इशस्तवन गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सागर मच्छिंद्र डवरी यांनी केले. तर मराठी विभागातील प्राध्यापकवर्गाने कवितेचे गायन केले.मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या स्पर्धांचा आढावा घेतला तसेच पहिल्या सत्रातील ग्रंथ प्रदर्शन आणि मराठी सुलेखन यांची महिती दिली. प्रास्ताविकानंतर मान्यवरांची भाषणे झाली. प्राचार्यांनी प्रदर्शन दालनाचे महत्त्व मांडले, त्यानंतर डॉ. गीता येर्लेकर यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व आपल्या वाणीतून विषद केले. अध्यक्षीय भाषणात श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर सर यांनी आयोजित स्पर्धांचे कौतुक केले. मराठी भाषा कशी आपल्या जवळची भाषा आहे हे आपल्या प्रवाही वक्तव्यातून मांडले. कार्यक्रमाचे आभार प्रा. नवसो परब यांनी मांडले. प्रा. भक्ती महाजन यांनी पसायदान गायन केले आणि समारंभाची सांगता झाली. त्यानंतर मराठी स्वाक्षरी दालन येथे मान्यवरांनी मराठी स्वाक्षरी केल्या आणि प्रदर्शन दालन सर्वांसाठी खुले केल्याचे जाहीर केले. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांनी दालनातील ग्रंथ प्रदर्शन आणि मराठी सुलेखनाचा आनंद घेतला. हे दालन आठवडाभर सर्वांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुशा होंडकर यांनी केले. विविध विभागाचे प्राध्यापक, महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. प्रमोद केरकर सर, शिक्षणशास्त्र विभागाचे डॉ. राजीव पंचम सर, प्रा. असावरी अष्टेकर, प्रा. रेणुका परदेशी, प्रा. नरेंद्र पांडव, प्रा. प्रचिती गणफुले, प्रा. शशिकांत पवार उपस्थित होते.
द्वितीय सत्र ऑनलाईन व्याख्यान झाले. “मराठी भाषा गौरव दिन” या विषयावर श्री. परेश प्रभू यांनी मराठी भाषेचा गोमंतक इतिहास मांडला. मराठीच्या प्राचीन इतिहासाचा पट थोडक्यात समोर उभा केला. हे अभ्यासू व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भक्ती महाजन यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. गीता येर्लेकर यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रा. सागर डवरी यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar