यावेळी सर्वप्रथम हायस्कूलचे मुख्याध्यापक नागेश गोसावी यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यानंतर कुमारी शाईन जोरामनर हिने तयार केलेल्या भित्ती पत्रकाचे व कु. रमाकांत साळगावकर यांने रेखाटलेल्या कुसुमाग्रजांच्या छायाचित्राचे अनावरण मुख्याध्यापक नागेश गोसावी व शिक्षक प्रतिनिधी रत्नाकर राव यांनी केले तर नंतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलींनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी इयत्ता आठवीच्या मुलींना आली ठुमकत लचकत नववीच्या मुलांनी रखुमाई रखुमाई सादर केली सावरकरांवर एक ऐतिहासिक प्रसंगाचे कथा कथन केले तर संगिता कुबल हिने विज्ञान विषयाचे महत्त्व सांगणारी एक साहस कथा सांगितली. वरद ज्योतिषी व ऋषिकेश जोशी याने चित्पावनी भाषेतून संवाद सादर केला. शिक्षिका सौ. शारदा परब यांनी विद्यार्थ्यांसाठी भाषिक खेळ घेऊन मुलांचे मनोरंजन केले. तर शेवटी ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे यावर नववी विरुद्ध दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परिसंवाद घेण्यात आला. मराठी दिना बद्दल बोलत असताना मुख्याध्यापक यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यांने आपली भाषा समृद्ध करण्यासाठी वाचनालयातील जास्तीत जास्त पुस्तके घेऊन वाचावी व आपला भाषिक साठा वाढवावा .शेवटी कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मुख्याध्यापकांच्या हस्ते भेटवस्तू म्हणून पेनं देण्यात आली.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षिका सौ शारदा परब यांनी केले.