आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी मातृभाषेच्या अध्ययनातून आपली आकलन क्षमता विकसित होते असे प्रतिपादन केले

.

संपर्कक्रांतिच्या माध्यमातून सर्व जग एकत्र येत असताना बहुभाषिक होणे ही काळाची गरज असली तरी आपण आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये असे उद्गार श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्णचे प्राचार्य श्री उमेश नाईक यांनी काढले. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी मातृभाषेच्या अध्ययनातून आपली आकलन क्षमता विकसित होते असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक रामचंद्र नाईक देसाई तसेच प्राध्यापिका श्वेता वजरकर उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे महत्व व विशेषता प्राध्यापक देसाई यांनी विद्यार्थ्यांसमोर विशद केली. मातृभाषा दिनाचे औचित्य साधून यावेळी मिताली तळणकर, रिमा फडते, श्रद्धा कोरगावकर ,शांती नाईक ,उर्वशी वझरकर साक्षी चांदईकर ,राणी जळगेकर, प्राची कुबल, प्रियांक सावळ ,कृणाल परब ,सुकन्या नाईक,नेहा नाईक या विद्यार्थीनींनी मराठी हिंदी कोकणी या भाषातुन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्वेता वझरकर यांनी केले प्राध्यापिका अपूर्वा सावंत यांनी कार्यक्रमांच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar