स्वतःला जागे करा : शोभा बहेनजी
जगात आज अशांतता आहे. प्रत्येकाला शांती हवी आहे. ही शांती हवी असेल तर स्वतःच्या मनाला म्हणजेच स्वतः जागे व्हा, असे आवाहन प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या गोवा राज्याच्या संचालक शोभा बहेनजी यांनी केले.
महाशिवरात्री व देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर म्हापसा विभाग प्रमुख ममता बहेनजी, डॉ. प्रसाद परब ,शोभा बहन, म्हापशातील उद्योजक महंमद,मोतीवाला विद्याधर हळदणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधाधर हळदणकर यांनी केले. आणि यावेळी पत्रकार भारत बेतकेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ प्रसाद परब यांनी आपले विचार मांडले.