श्री सटी भवानी देवस्थानत आज महाद्वारपाल पुजा वर्धापन दिन ८ मार्च रोजी

.

पणजी, ता. ५ (प्रतिनिधी) : भाटले-पणजी येथील सटी भवानी देवस्थानचा ४३ वा वर्धापन दिन व पालखी सोहळा ८ मार्चपासून १३ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमानिशी होणार आहे. यानिमित्त रविवारी महाद्वारपाल पुजा सकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ८ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक, गणपती पूजन, पुण्याह वाचन, देवता प्रार्थना रूद्रहवन होईल. दुपारी १२.३० वाजता आरती तीर्थप्रसाद त्यानंतर सायंकाळी ७ वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. ९ रोजी सकाळी ७ वाजता अभिषेक, गणपती पूजन, पुण्याह वाचन, देवता प्रार्थना रूद्रहवन होईल. दुपारी १२.३० वाजता आरती तीर्थप्रसाद त्यानंतर सायंकाळी ७ वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. गुरूवार १० रोजी सकाळी सात वाजल्यापासून विविध धार्मिक विधी, दुपारी १२.३० वाजता आरती, महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ वाजता श्रीची पालखी मिरवणूक होईल. शुक्रवार दि.११ रोजी रात्री ८ वाजता फळांची पावणी होईल. रात्री दहा वाजता सुविसिनींच्या जोडव्याचा कार्यक्रम होईल. शनिवार दि.१२ रोजी दुपारी ३ वाजता भाटले स्पोर्टस क्लबतर्फे सत्यनारायण पूजा होईल. ७ वाजता भजन, तर ८ वाजता फळांची पावणी होईल. रात्री दहा वाजता अभिनय, पणजी प्रस्तुत २ अंकी कोकणी नाटक ‘आवयचो पूत,सुनेचेर भूत’ हे सादर होईल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar