म्हापसा बोडगेश्वर मंदिराची निवडणूक चूरशीची होईल

.

बार्देश दि ०५ (प्रतिनिधी ):-बार्देश तालुक्यातील ३४ मंदिराच्या निवडणुका येत्या रविवारी १३ मार्च रोजी होऊ घातल्या आहेत. यातील श्री देव बोडगेश्वर मंदिरातील निवडणूक चूरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विद्यमान समिती कार्यरत असताना कोरोनाचे ग्रहण लागले. त्यामुळे एक जत्रौत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करावा लागला. या तीन वर्षाच्या काळात विद्यमान समितीने जमाखर्चाचा अहवाल सादर केला नसल्याचा आरोप विरोधी सदस्यांकडून केला जात आहे. त्यामुळे येत्या देवस्थान निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना वाव मिळावा. व नवी समिती निवडून येण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान विद्यमान समितीने २५०० हुन अधिक महाजनापैकी केवळ ६१५ महाजनांचे नूतनिकरण केले असून त्यांनाच मतदान करायचा अधिकार राहील. त्यामुळे आपल्याच गटाचे महाजन या निवडणुकीत मतदान करून पुन्हा हीच समिती निवडून येईल अशी तरतूद विद्यमान समितीने केल्याचा आरोप केला जात आहे.
मंदिर हे सार्वजनिक असल्याने विशिष्ठ लोकांनीच या समितीवर येण्याचे प्रयोजन काय? असा प्रश्नही महाजन, भक्त आणि भाविक उपस्थित करीत आहेत.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें