हणजूण मुड्डी येथील इशा गेस्ट हाऊस मध्ये काही विदेशी महिला रहात असल्याची खबर हणजूण पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी इतर सहकाऱ्यांसोबत धाड टाकून त्या सहा महिलांना ताब्यात घेतले. त्या प्रवासाचा कोणताही वैध दाखला ( पासपोर्ट व व्हिसा ) सादर करू शकल्या नाहीत.
दरम्यान या विदेशी महिलांची माहितीचा ” सी “फॉर्म एफआरआरओ, पणजी ला सादर न केल्याबद्दल हणजूण पोलिसांनी इशा गेस्ट हाऊस च्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
गेल्याच महिन्यात याच गेस्ट हाऊस मध्ये बेकायदा वास्तव्य केल्या प्रकरणी दहा नायजेरियन व युगांडाच्या महिला विरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली होती. या विदेशी महिला वागातोर येथील नाईटक्लब मध्ये अनैतिक व्यवसाय करीत असतात अशी चर्चा परिसरात चर्चीली जाते.