संघटनेचे माजी अध्यक्ष आशिष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत, एक मताने श्रीपाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 2022 ते 2025 या तीन वर्षाच्या काळाकरिता नवीन कार्यकारिणी समितीची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष-आसिस कारदोझ, सचिव -सिद्देश राऊत, उप सचिव -पांडुरंग सावंत, खजिनदार – जितेंद्र फळारी, उपखजिनदार – विशाल फळारी, सदस्य – आशिष शिरोडकर, गीतेश डांगी, राजेंद्र पेडणेकर, रुपेश शिंदे, आणी वल्लभ मिशाळ.
यावेळी आशिष शिरोडकर यांनी नवनिर्वाचित समितीचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी आपले पूर्ण सहकार्य असल्याचे आश्वासन दिले. नूतन अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी समिती सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले तसेच व्यापारी बंधूंच्या हितासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे त्यनी सांगितले. प्राधान्याने बाजारातील रस्त्यांची डागडुजी व बंद टॉयलेट चे नूतनीकरण, तसेच म्हापसा मार्केटमधील विविध समस्या सोडवण्यासाठी लवकरच नवीन समितीला घेऊन म्हापसा नगर पालिकेच्या नगराध्यक्षांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी सचिव सिद्धेश राऊत यांनी सगळ्यांचे आभार मानले.