निवृत्त शिक्षक, सहायक मुख्याध्यापक धुळेर म्हापसा येथील रहिवासी श्री प्रदीप मोहनराव सावंत. श्री भगवती हायस्कूल पेडणे येथे दीर्घ काळ विद्यादानाचे त्यांनी कार्य केले आहे. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक असून प्रयोगशील शिक्षक म्हणून सदोदित कार्यरत राहिले. त्यानी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेले असून, समाज व राष्ट्र यांच्या प्रती समर्पित राहून निरपेक्षपणे आपले कार्य केले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्यातर्फे त्यांची राष्ट्रीय सेवा व कार्य गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
दि:१३ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजता नाशिकच्या कालिदास कला मंदिर नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे कार्यक्रमाला महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश गोवा आदी ठिकाणाहून पुरस्कारार्थी येणार आहेत.
लोकप्रिय अभिनेते हार्दिक जोशी संपादक विनोद कुलकर्णी आदी पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
श्री* *प्रदीप मोहनराव सावंत यांना राष्ट्रीय* *सेवा व कार्य गौरव पुरस्कार
.
[ays_slider id=1]