उमाळवाडा पिर्ण येथील श्री राष्ट्रोळी पारधींवस नाटक उत्सव शनिवारी दि. १२ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.यानिमित सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा नंतर आरती , तीर्थप्रसाद व दुपारी १ वाजता महाप्रसाद व श्री देवी सती मंदीरात ओटो भरणी कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता पार्सेकर दशावतारी नाट्य मंडळाचा ” साडेतीन शंकर “नाट्य प्रयोग होणार आहे . सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उमाळ वाडा ग्रामस्थांनी केले आहे.