कार्यक्रमास गोव्यातील सुप्रसिद्ध निवेदिका सौ. सारिका शिरोडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सौ. अपर्णा कामत ह्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या खेळांनी झाली. दिपप्रज्वलनाने सुरुवात होऊन प्रथम कु. साची लोटलिकर हिच्या गिटार वादनाने कार्यक्रम सुरु झाला. त्यानंतर कु. वैभवी, कु. शुभ्रा बर्वे आणि कु. तन्वी बर्वे ह्यांनी सुमधुर गाणी म्हटली. शारदा संगित विद्यालयाच्या संचालिका कु. वनिता पांडुरंग सामंत ज्या दृष्टि अधु असुनही गेली अनेक वर्षे मुला मुलींसाठी हार्मोनियमचे क्लास घेतात, त्यांचा सत्कार करण्यात आला. म्हापश्यातील जेष्ठ समाजसेविका सौ. रेखाताई पोकळे यांच्या हस्ते सत्कार झाला. सौ. सारिका शिरोडकर ह्यांनी महिलांना प्रेरणा मिळणारे सुरेख विचार मांडले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. रोशन सामंत यांनी मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संजना मराठे ह्यांनी केले.