सांगोल्डा येथील ओशन वेलनेस रिसॉर्ट चे आशिष के. पाटील यांनी सांगोल्डा पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारी नुसार दि. 5 रोजी संतोष भोज याने हॉटेलच्या कॅश काउंटर मधून रोख एक लाख रुपये चोरून पलायन केले. तक्रारीनंतर सांगोल्डा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विष्णू जाधव यांनी संतोष भोज याचे विरुद्ध भादस 381 कलमाखाली गुन्हा नोंद केला व तपास कामास सुरवात करून भोज याला अटक केली.