_हिंदु जनजागृती समितीचे प्रशासन आणि पोलीस यांना आवाहन_

.

_*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*_

_हिंदु जनजागृती समितीचे प्रशासन आणि पोलीस यांना आवाहन_

होळीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखून धार्मिक उत्सवांचे पावित्र्य राखा !

फोंडा, ९ मार्च – होळीच्या निमित्ताने होणारे गैरप्रकार रोखून धार्मिक उत्सवांचे पावित्र्य राखा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने फोंडा येथील उपजिल्हाधिकारी आणि फोंडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये श्री. श्रीराम खेडेकर, श्री. राम वैद्य, सनातन संस्थेच्या सौ. हर्षा गुरव आणि धर्मप्रेमी सौ. नयन नाईक यांचा सहभाग होता.
हिंदु जनजागृती समितीने या निवेदनात म्हटले आहे की, ‘दुष्प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी !’ दुर्दैवाने सध्या या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. या दिवशी दारू पिऊन धिंगाणा घालणे, रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्‍लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे,आदी प्रकार वाढत चालले आहेत. यांसह अंमली पदार्थांचे सेवन, ‘रेव्हपार्ट्या’ यांसारखे युवा पिढीला नासवण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. या कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने रंग खेळणे, पादचारी आणि स्त्रिया यांवर फुगे मारणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान करणे आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा. आरोग्याला घातक, तसेच प्रतिबंधित रासायनिक रंगांची विक्री करणार्‍यांवर आणि बळजोरीने रंग फासून फुगे मारणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

आपला नम्र
डॉ. मनोज सोलंकी,
हिंदु जनजागृती समिती
संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar