मुलांसारखे मुलींना सुद्धा शिकण्याची समान संधी देऊन त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांना संधी द्या असे उद्गार कुमारी नेहा फरास यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सरकारी प्राथमिक विद्यालय मधलावाडा केरी शाळेत सन्मानित करताना काढले. महिला दिनाचे औचित्य साधून शाळेच्या दोन माजी विद्यार्थिनी ज्यांनी मेडिकल क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले त्या कुमारी नेहा फरास व सुकन्या केरकर या विद्यार्थिनींचा सर्व पालक विद्यार्थ्यांच्या उपस्थित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी त्यांना आपल्या भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आपल्या माजी विद्यार्थी यांच्या चांगल्या कार्याची दखल घेण्यासाठी असे कार्यक्रम राबवावे लागतात असे शाळा प्रमुख सौ यशश्री यांनी पालकांना व विद्यार्थांना मार्गदर्शन करताना सांगितले .यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री भीमा देवजी पंच सौ नमिता केरकर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .या मान्यवरांच्या हस्ते भारताच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्त पतंजली योगा आयोजित सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. शेवटी पालकांसाठी काही फनी गेम्स घेऊन त्यांना बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका कुमारी सोनाली हरमलकर यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत शिक्षिका यशश्री नाईक यांनी केले तर आभार शिक्षिका विद्या मोरजकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी शिक्षिका मीना बुडके पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका मिलन कोर खण कर यांनी सहकार्य केले शेवटी अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.