पणजी : गोव्यातील जनतेने दिलेला निकाल स्वीकारतना, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी गुरुवारी सांगितले की, काँग्रेस एका दिशेने भाजपविरोधी भावना प्रभावीपणे पोहोचवू शकला नाही, ज्या तीन वेगवेगळ्या दिशांनी गेल्या आणि त्यामुळे भाजप विजयी झाला.
मतांची विभागणी झाल्याने भाजपला सहजपणे बहुतेक जागा जिंकण्यासाठी लाभ झाला असे ते म्हणाले. गोव्यात प्रचार कऱायला आलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी गोव्यातील जनतेचे आभार मानले.
पी. चिदंबरम यांनी गुरुवारी पणजीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, काँग्रेस पक्ष लोकांच्या भावनांचा आदर करतो.
गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, युरी आलेमांव आदी यावेळी उपस्थित होते.
“आम्ही अनेक मतदारसंघात कमी फरकाने पराभूत झालो आहोत. गोव्यातील लोकांना बदल हवा होता हे स्पष्ट आहे, परंतु मतांच्या विभाजनाने भाजपला संधी दिली.” असे चिदंबरम म्हणाले.
दिनेश गुंडू राव म्हणाले की, काँग्रेसने प्रभावीपणे लढा दिला आणि लोकांच्या इच्छेचाही आदर केला. “लोकांच्या इच्छेनुसार आम्ही नवे चेहरे दिले. आम्ही पक्षांतर करणाऱ्यांना पुन्हा प्रवेश दिला नाही आणि पुन्हा लोकांच्या मागणीचा आदर केला.
“लोकांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे. भाजप जनतेची इच्छा ऐकेल अशी आशा करतो. आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावू.” असे ते पुढे म्हणालेम
ते म्हणाले की, मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसच्या काही जागा कमी झाल्या आहेत. मतांचे विभाजन करण्याचे भाजपचे डावपेच यशस्वी झाले आहेत.
“आम्ही कुठे चुकलो आणि ज्या चुका केल्या आहेत याचे विश्लेषण करू. त्यानंतर आम्ही पक्षात सुधारणा करू.” असे ते म्हणाले.
गिरीश चोडणकर म्हणाले की, गोव्यातील जनतेने दिलेला निकाल मान्य आहे. ६७ टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकांनी जे बदल मागितले होते ते सर्व अमलात आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. पक्षांतर केलेल्या सात उमेदवारांना लोकांनी घरी पाठवले आहे. आम्ही बदल घडवत राहू.
त्यांच्या मते, मतांचे विभाजन न करण्याबाबत लोकांना पटवून देण्यात काँग्रेस अपयशी ठरली, ज्याचा फायदा भाजपला झाला.
“भाजपला विजयाची आशा होती कारण त्यांना माहित होते की मतांचे विभाजन होईल आणि अशा प्रकारे त्यांना विजय मिळेल.” असे चोडणकर म्हणाले.
मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसचे सात उमेदवार भाजपकडून पराभूत झाले असे ते म्हणाले.
दिगंबर कामत म्हणाले की, आपला सर्वांचा लोकशाहीवर विश्वास आहे. “आम्ही अत्यंत नम्रतेने हा निकाल स्वीकारतो.” असे ते म्हणाले.