शिवोली मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या डिलायला लोबो यांनी विजय मिळवून इतिहास घडवला, या मतदार संघाच्या 14 व्या आमदार झालेल्या त्या पहिल्या ख्रिस्ती आमदार

.

या पूर्वीचे तेराही आमदार हे हिंदू होते. शिवोली मतदार संघाबाहेरील त्या तिसऱ्या आमदार ठरल्या, तर पहिल्यादांच काँग्रेस पक्षाने या शिवोली मतदार संघात आपले खाते उघडले. 1963 मध्ये निवडून आलेले पा. पु. शिरोडकर व त्यानंतरचे पुनाजी आचरेकर हे मतदारसंघा बाहेरील उमेदवार होते.
पूर्वीचा मगोचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात मगो नंतर भाजपाने वर्चस्व गाजवले, 2017 च्या निवडणुकीत मात्र गोवा फॉरवर्ड पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. शिवोली मतदार संघात एकूण 29000 मतदार असून 2022 च्या या निवडणुकीत 23826 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत गोव्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 13 उमेदवार नशीब अजमावण्यासाठी रींगणात होते. या वेळी मिळालेल्या मतांचा आकडेवारीनुसार 2017 चे विजयी उमेदवार विनोद पालयेकर सहाव्या क्रमांकावर फेकले गेले, त्यांना अवघी 386 मते मिळाली.
या वेळच्या विजयी उमेदवार डिलायला लोबो यांना 9197 मते प्राप्त झाली त्यांनी भाजपाचे दयानंद मांद्रेकर यांचा 1646 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. मांद्रेकर यांना 7549 मते मिळाली.2017 सालीही त्यांचा विनोद पालयेकर यांनी 1441 मतांची आघाडी घेऊन पराभव केला होता. या निवडणुकीत पहिल्यादांच निवडणूक लढवणाऱ्या रिवोलूशनरी गोवन्स पक्षाच्या गौरेश मांद्रेकर यांना 3107 मते मिळाली तर दुसऱ्यांदा अपक्ष निवडणूक लढवणारे हणजूण कायसुवचे सरपंच सावियो अल्मेदा यांना फक्त 1434 मते मिळाली. याच मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे आम आदमी पक्षाचे विष्णू नाईक यांना 834 मते मिळाली,2017 मध्ये त्यांना जास्त मते मिळाली होती, तर समाजकार्यातून मागची दोन तीन वर्षे निवडणुकीची तयारी करणारे अपक्ष उमेदवार दत्ताराम पेडणेकर यांना फक्त 441 मतावर समाधान मानावे लागले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar