कळंगुटाबरोबरच राज्यातील प्रत्येक मतदार संघातील समस्यांना धरणे, आंदोलनाद्वारे वाचा फोडणार असल्याची ग्वाही कळंगुटचे नवनियुक्त आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटात दिली

.

भाऊसाहेब बांदोडकरांनी गोव्यात शिक्षणाचा पाया रचला, हेच सर्व शिक्षण गोव्यातील सर्वांना मोफत देण्याची गरज आहे.राज्यात कॉग्रेसचे सरकार स्थापन् करण्यासाठी आमचें प्रयत्न जारी होता, परंतु या शर्यतीत आंम्ही कुठेतरी मागे पडलो आहोत त्यामुळे सध्यातरी आमच्यापुरती ही शर्यत संपलेली आहे. कळंगुटच्या मतदारांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवित पाच हजाराहून अधिक मतांनी मला विजयी केलेले आहे त्यामुळे त्या विश्वासाला पात्र राहून एक सच्चा कॉग्रेस कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहाणार असून कळंगुटाबरोबरच राज्यातील प्रत्येक मतदार संघातील समस्यांना धरणे, आंदोलनाद्वारे वाचा फोडणार असल्याची ग्वाही कळंगुटचे नवनियुक्त आमदार तथा माजी मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुटात दिली.
गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात लोबो बोलत होते. यावेळी कळंगुटचे सरपंच शॉन मार्टीन्स, उप-सरपंच शेरॉल लोबो, स्थानिक श्री बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेंकर, पंचायत मंडळाचे इतर सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने कॉग्रेसला नाकारण्याचे कारण विचारले असतां लोबो यांनी आपण कॉग्रेस पक्षात नवीन असल्याने यांवर पक्षाच्या वरिष्ठांनी अधिक भाष्य करणेच योग्य ठरणार असे सांगितले परंतु तिसवाडी बार्दैश पेक्षा कॉग्रेस दक्षिणेत विशेष करून सासष्टीत कमी पडल्याचे सांगितले. कॉग्रेसने यापुढे तरुण रक्ताला राजकीय क्षेत्रात सामावून घेणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांनी आपल्याला उद्देशून जादुगर असे संबोधल्याचा उल्लेख करतांना माजी मंत्री मायकल लोबो यांनी आपण जादुगर नसून सामान्य माणसाच्या भावनां जाणून घेणारा राजकरणी असल्याचे सांगितले, तुम्हीं जेव्हा सामान्य माणसाच्या हाकेला ओ देतात तेव्हा सामान्य माणूस तुम्हांला आपल्या ह्रुदयात जागा देत असतो म्हणूनच सामान्य माणसाच्या व्यथा वेदना ऐकून घेत त्यांना वाट करून देण्याची तळमळ प्रत्येक राजकारण्यामध्ये असली पाहिजे तरच प्रत्येक राजकारणी समाजमनावर जादुमय कामगिरी करुं शकतो असे म्हणत लोबो यांनी मांद्रेकर यांची फिरकी घेतली. स्व. भाऊसाहेब बांदोडकर हे अशाच लोकांपैकी अग्रस्थानी असलेले विशेष असे व्यक्तीमत्व होते, त्यांच्यामुळेच गोव्यातील गरीब जनतेला मुंडकार कायद्याद्वारे राहात्या घराचा हक्क आणि कसेल त्याची जमीन कायद्याद्वारे शेतजमीनीचा मालकी वाटा प्राप्त झाल्याचे यावेळी आमदार मायकल लोबो यांनी सांगितले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक तसेच भाऊसाहेब बांदोडकर ट्रस्टचे डायस, सौ. प्रतिभा नार्वेकर , सरपंच शॉन मार्टीन्स तसेच चंद्रकांत चोडणकर यांची भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारी भाषणे झाली. संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेंकर यांनी केले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar