भारतीय बनावटीच्या टाटा कंपनीच्या गाड्या चांगल्या असतात, आपल्याला त्या आवडतात, त्या टिकावू आणी विदेशी बनावटीस तुल्यबळ असल्याने पुढील गाडी आपली टाटा मोटर्स ची असेल असे ठरवले होते, भारतीय बनावटीच्या वस्तुंना आपण प्रोत्साहन देण्याची गरज आहे असे मत काझीरंगा आवृत्तीच्या प्रथम ग्राहक रुक्मा सडेकर यांनी यावेळी सांगितले.
टाटा मोटर्स ने पर्यावरणाशी जुळणाऱ्या काझीरंगा आवृत्तीतील सफारी, हेरिअर, निक्सओन व पवालं अश्या चार प्रकरातील एसयूव्ही ब्रँड च्या गाड्या बाजारपेठेत उपलब्ध केल्या आहेत, गोव्यातील पहिल्या गाडीचे अनावरण व विक्री करण्याचा मान आम्हाला मिळाल्याचे दुर्गा मोटर्स चे विक्री प्रमुख सुदेश आर. यांनी सांगितले.