मांद्रे हायस्कूल पालक शिक्षक संघातर्फे आज ‘पालक दिन’ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान, विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

.

 

मांद्रे हायस्कूलच्या पालक शिक्षक संघातर्फे शनिवार १२ मार्च रोजी दुपारी ३.०० वाजता ‘पालक दिन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्य जैव विविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम हे उपस्थित राहणार आहेत.

पालक दिन कार्यक्रमात शालान्त परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करताना विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच दहावीतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. याशिवाय विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण होणार आहे.

या कार्यक्रमात अंशिका दशरथ बर्डे, प्रिती प्रभाकर पालयेकर, अक्षया अविनाश गडेकर, सार्थक सागर केरकर, कृतिका बाबू किनळेकर, सिया सुनील पुर्खे, रविना राजन च्यारी, श्रेया शेखर मांजरेकर, सुदीप संदीप कांबळी, लवू उदय गावडे, अर्चिता साईनाथ नारोजी, मधुर दीपक शेटमांद्रेकर, अनिशा एकनाथ कवठणकर, वैष्णवी विद्याधर गडेकर, कौस्तुभ मच्छिंद्रनाथ कायसुकर, पियुष केशव गोवेकर, साहिल महेश किनळेकर, सानिया सुनील कोरगावकर, निखिल राजन च्यारी, अथर्व गोविंद तिळवे, स्नेहा राजन मांद्रेकर या विशेष श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar