शापोरा, कायसूव येथील श्री सिद्वेश्वर देवस्थानच्या एप्रिल 2022 ते मार्च 2025 या कार्यकाळाकरिता निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जयदेव रामा शिरोडकर यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली

.

शापोरा, कायसूव येथील श्री सिद्वेश्वर देवस्थानच्या एप्रिल 2022 ते मार्च 2025 या कार्यकाळाकरिता निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जयदेव रामा शिरोडकर यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. सलग तीन टर्म अध्यक्ष पदी रहाण्याची त्यांनी हैट्रिक साधली यासाठी त्यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

आपल्या अध्यक्षपदाच्या काळात आपण बऱ्याच चांगल्या सुधारणा केल्या, देवस्थानचे नूतनीकरण केले, सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात केली तसेच कोवीड काळात अच्युतानंद स्वामी पुण्यतिथी व इतर उपक्रम योग्यरीतीने साजरे केल्याने देवस्थानच्या महाजनांनी आपल्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला या बद्दल त्यांचे आभारी असल्याचे जयदेव शिरोडकर यांनी सांगितले.
निवडण्यात आलेली नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे…. अध्यक्ष.. जयदेव रामा शिरोडकर, उपाध्यक्ष.. अमोल अनिल गोवेकर, सचिव.. कृष्णकांत शाणू गोवेकर, उपसचिव.. निलेश गुरूदास चोडणकर, खजिनदार.. सुशांत नरेंद्र चिमूलकर, उपखजिनदार.. दत्ता तुकाराम ताम्हणकर, मुखत्यार.. रमेश पुंडलिक फडते, उपमुखत्यार.. पांडुरंग म्हात्रू शिरोडकर.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar