सेंट अँथोनी चर्च ते आसगाव पर्यतच्या रस्त्याच्या हॉटमिक्सींग फेरडांबरीकरणास शिवोलीच्या नवनियुक्त आमदार डिलायला लोबो यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली

.

 

सेंट अँथोनी चर्च ते आसगाव पर्यतच्या रस्त्याच्या हॉटमिक्सींग फेरडांबरीकरणास शिवोलीच्या नवनियुक्त आमदार डिलायला लोबो यांच्या हस्ते सुरवात करण्यात आली. तिळारीची जलवाहिनी टाकण्याचे काम रेंगाळल्यामुळे या रस्त्याचे फेरडांबरीकरण रखडले होते, खड्डेमय झालेल्या या रस्त्याचे हॉटमिक्सींग व्हावे अशी मागणी येथील जनतेकडून सतत होत होती. निवडून आल्यानंतर आमदार डिलायला लोबो यांनी विकास कामांना सुरवात केली.
मतदार संघात चांगले रस्ते देण्यास आपण कटिबद्ध आहे, निवडणुकीपूर्वी आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास आपण सुरवात केली आहे, शिवोली मतदार संघ बार्देशातील आदर्श मतदार संघ करण्याकरिता व विकासकामांकरीता जनतेने आपणास सहकार्य करावे असे आवाहन आमदार डिलायला लोबो यांनी यावेळी पत्रकारांकडे बोलताना केले.
यावेळी मार्ना शिवोलीच्या सरपंच शर्मिला वेर्णेकर, उपसरपंच विल्यम फर्नांडिस, पंच सदस्य सिल्व्हेस्टर फर्नाडिस, पंच सदस्य मोनाली आगरवाडेकर, इतर पंचायतीचे पंचसदस्य व नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar