म्हापसा शिगमोत्सव मंडळातर्फे गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने रविवार दि.20 मार्च रोजी अखिल गोवा रोमटामेळ व चित्ररथ स्पर्धा होणार आहे

.

 

म्हापसा शिगमोत्सव मंडळातर्फे गोवा सरकारच्या पर्यटन खात्याच्या सहकार्याने रविवार दि.20 मार्च रोजी अखिल गोवा रोमटामेळ व चित्ररथ स्पर्धा होणार आहे, या निमित्त म्हापसा शिगमोत्सव मंडळाची नवी समिती निवडण्यात आल्याची माहिती कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. गुरूदास नाटेकर यांनी दिली. म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
म्हापसा शिगमोत्सव मंडळ सन २०२२ ची खालीलप्रमाणे समिती निवडण्यात आलेली समिती पुढीलप्रमाणे.. अध्यक्ष. जोशुआ पीटर डिसोजा, (आमदार, म्हापसा मतदारसंघ) उपाध्यक्ष: सौ. शुभांगी गु. वायगंणकर ( नगराध्यक्षा – म्हापसा नगरपालिका )
कार्यकारी उपाध्यक्ष: श्री. सीताराम सावळ, (मुख्याधिकारी, म्हापसा नगरपालिका)
कार्यक्रमाचे कार्यकारी मंडळ: अध्यक्ष: डॉ. गुरुदास भा. नाटेकर उपाध्यक्ष: प्रदीप वि. कवळेकर, चिटणीस : चंदन गोपी नाईक, चिटणीस : सुब्राज काणेकर, (लेखा व प्रशासकीय अधिकारी, म्हापसा नगरपालिका), उप-चिटणीस : प्रा. रवींद्र फोगेरी
उप-चिटणीस : विकास कांबळी,( हेड क्लार्क, म्हापसा नगरपालिका ),खजिनदार: सदानंद शेट नार्वेकर
खजिनदार: सौ. स्मिता फळदेसाई,( लेखापाल, म्हापसा नगरपालिका ),उप- खजिनदार: दिनेश ग. पानकर,उप- खजिनदार: ज्ञानेश्वर पार्सेकर, ( ग्रंथपाल, म्हापसा नगरपालिका )
सल्लागार समिती: राजेंद्र ग. पानकर, प्रसन्ना बुर्ये, मोहन पु. काणेकर, दामोदर (बाबू) नाटेकर, विलास पानकर, सुशांत पेडणेकर, अवधूत स. नार्वेकर, महादेव सा. नाटेकर, अनिल भर्तू, शिवानंद म. धावजेकर
सभासद: अजित मांद्रेकर,सागर श्री. नार्वेकर, अच्युत वेर्णेकर, रमेश रा. शेट मणेरकर, सुहास सिरसाट, अभी गवंडळकर, सागर गो. नाईक, विनायक दिवकर, भालचंद्र नाटेकर, संजय, मिशाळ, महेश भिवशेट, सोमनाथ नाईक, विशांत पानकर, रुद्रेश्वर नाटेकर, विवेक नाटेकर, सोमनाथ नाटेकर, निळकंठ शेट, मिलिंद महाले, यशवंत गवंडळकर, गुरुदास ढेकणे, भारत तोरस्कर, दत्ताराम (बाप्पा) नाटेकर, कुंदल नाटेकर, आनंद भाईडकर, चंद्रशेखर बेनकर, बार्बरा कॅरास्को, सुशांत हरमलकर, शशांक नार्वेकर, नूतन बिचोलकर, तारक आरोलकर, विकास आरोलकर, कायल ब्रागांझा, प्रिया मिशाळ, किशोरी कोरगावकर, आशीर्वाद खोर्जुवेकर, कमल डिसोजा, साईनाथ राऊळ, स्वप्नील शिरोडकर, विराज फडके, अन्वी कोरगावकर, सुधीर कांदोळकर, प्रकाश भिवशेट
प्रसिद्दी समिती: प्रकाश धुमाळ, नारायण राठवड, सुदेश आर्लेकर, रमेश नाईक, तुषार टोपले, अनिल लाड, गिरीश मांद्रेकर, प्रसाद म्हाम्बरे, सुभाष कवठणकर , आग्नेल परेरा, उमेश झर्मेकर, रेणुका तळेगावकर, अर्पिता श्रीवास्तव, संदीप कामूलकर, नवसो पिंगुळीकर, शामसुंदर फडते, साईप्रसाद कुबडे, भारत बेतकेकर, सौरव शिरोडकर, डेनवर डिसोजा, कमलाकर हुमरस्कर, प्रकाश गडेकर, योगेश मिराशी, नितीक्षा गावकर
म्हापसा शिगमोत्सव मंडळ आयोजित आणि गोवा सरकारचे पर्यटन खाते पुरस्कृत यंदा शिगमोत्सवाचे विविध कार्यक्रम १८ ते २० मार्च २०२२ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवार दिनांक १८.०३.२०२२ रोजी म्हापसा टॅक्सी स्टँण्ड वर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात संध्याकाळी ६.३० वाजता गुलालोत्सव साजरा करण्यात येईल. त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हापसा मतदारसंघाचे आमदार जोशुआ पीटर डिसोजा व म्हापसा नगरपालिकेच्या अध्यक्षा सौ. . शुभांगी वायगंणकर उपस्थित राहतील. तदनंतर ‘ ब ‘ गटातील ( लहान मुलांसाठी ) वर्षे ५ ते १० पर्यंत वेशभूषा स्पर्धा ( फक्त १० स्पर्धकांना भाग घेता येईल ) व त्यानंतर वरीलप्रमाणेच मुलांसाठी डान्स ऑन रेकॉर्ड ही स्पर्धा घेणार येईल. शनिवार दिनांक १९.०३.२०२२ रोजी संध्याकाळी ६. ३० वाजता त्याच ठिकाणी प्रसिद्ध ‘ लावणी ‘ चा भव्य कार्यक्रम सादर केला जाईल. रविवार दिनांक २०.०३.२०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता सिने अलंकार जवळील राष्ट्रोळीला नमन करून अखिल गोवा चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य व ‘ अ ‘ गटातील फॅन्सी ड्रेस स्पर्धेला सुरवात होईल व रात्रौ ९ वाजता स्पर्धेची समाप्ती होईल. तरी या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन नाटेकर यांनी यावेळी केले.
स्पर्धेत भाग घेणाऱ्याने प्रवेश पत्रिका मोहन पु. काणेकर, काणेकर बिल्डिंग येथून घ्याव्यात व त्या दिनांक १८ रोजी त्याच ठिकाणी सुपूर्द कराव्यात. यंदा तार पुलाचे बांधकाम चालू असल्याकारणाने स्पर्धकांनी चित्ररथ सोयीस्कर मार्गाने म्हापसा येथील जुन्या आझिलो हॉस्पिटल शिस्तीने लावावेत,बक्षिसांची रक्कम जाहिरातीद्वारे नंतर प्रसिद्ध केली जाईल असे यावेळी नाटेकर यांनी सांगितले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar