_हिंदु जनजागृती समितीची मडगाव येथील पोलीस निरीक्षकांकडे मागणी_ काश्मिरी हिंदूंवरील आघातांना वाचा फोडणार्‍या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे प्रसिद्धी योग्यरितने करण्यास ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला भाग पाडावे

.

_*हिंदु जनजागृती समितीची प्रसिद्धीपत्रक*_

दिनांक : १३ मार्च २०२२

_हिंदु जनजागृती समितीची मडगाव येथील पोलीस निरीक्षकांकडे मागणी_
काश्मिरी हिंदूंवरील आघातांना वाचा फोडणार्‍या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे प्रसिद्धी योग्यरितने करण्यास ‘आयनॉक्स’ चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला भाग पाडावे
मडगाव, १३ मार्च – काश्मिरी हिंदूंवरील आघातांना वाचा फोडणार्‍या ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चपासून गोव्यात प्रदर्शित झाला आहे. जिहाद्यांचे क्रौर्य आणि हिंदूंचा आक्रोश या चित्रपटातून उघड करण्यात आले आहे. मडगाव येथे आयनॉक्स चित्रपटगृहातही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे; मात्र चित्रपट प्रदर्शित होऊनही चित्रपटाचे पोस्टर चित्रपटगृहाबाहेर लावलेले नाहीत. यामुळे हा चित्रपट पाहण्यापासून अनेक जण मुकू शकतात. यासाठी मडगाव येथे आयनॉक्स चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे ‘पोस्टर’ चित्रपटगृहाबाहेर लावण्यास सांगावे, अशी मागणी मडगाव येथील हिंदु जनजागृती समितीने १३ मार्च या दिवशी मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र नाईक यांच्याकडे केली. पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र नाईक यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन ही मागणी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे पोचवणार असल्याचे म्हणाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री गणेश जामदार, सुधाकर आगलावे, जितेंद्र कुंभार, दिगंबर जामदार आणि सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.
मडगाव येथील आयनॉक्स चित्रपटगृहाच्या मालकाने आणि ‘द काश्मिर फाईल्स्’ हा चित्रपट ‘हाऊसफूल’ असल्याचा फलक चित्रपटगृहाबाहेर लावून चित्रपटाच्या ४० टक्के तिकिट विक्री न करता दाबून ठेवल्या, तसेच चित्रपटगृहाच्या बाहेर इतर सर्व चित्रपटांचे पोस्टर लावले; मात्र ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा ‘पोस्टर’ प्रदर्शित केला नाही, असा आरोप होत आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वनिष्ठांनी मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र नाईक यांची भेट घेतली.

आपला विश्‍वासू,
डॉ. मनोज सोलंकी
हिंदु जनजागृती समिती
संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar