_‘द कश्मीर फाइल्स’ : काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे वास्तव दाखवणारा चित्रपट !_ ‘द कश्मीर फाइल्स्’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा !- उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी

.

_*हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*_

दिनांक : 14.3.2022

_‘द कश्मीर फाइल्स’ : काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचे वास्तव दाखवणारा चित्रपट !_

‘द कश्मीर फाइल्स्’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा !- उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी

पणजी, 14 मार्च – वर्ष 1990 मध्ये काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे वास्तव दाखवणारा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव या निमित्ताने प्रथमच जगासमोर आणले जात आहे. हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाला गोवा सरकारने ‘करमुक्त’ करण्याची घोषणा करावी आणि काश्मिरी हिंदूंप्रती सरकारची सहवेदना दर्शवावी, अशी कळकळीची मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हिंदु जनजागृती समितीने गेल्या 15 वर्षांत काश्मिरी हिंदूंच्या अत्याचाराविषयीचे ‘दहशतवादाचे भीषण सत्य’ हे फ्लेक्स प्रदर्शन 500 हून अधिक ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच ‘एक भारत अभियान : चलो कश्मीर की ओर’ या अभियानांतर्गत अनेक राज्यांत सभा घेऊन 10 लाखांहून अधिक हिंदूंना जागृत करण्यात आले आहे. तसेच समितीच्या वतीने काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फोडणार्‍या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी ऑनलाईन विशेष संवाद आयोजित करण्यात आला. काश्मिरी हिंदूंना न्याय मिळेपर्यंत हिंदु जनजागृती समिती लढत राहिल, असेही डॉ. मनोज सोलंकी यांनी या वेळी सांगितले.

आपला नम्र,
डॉ. मनोज सोलंकी,
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, गोवा.
संपर्क : 9326103278

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें