गणेश गुरुकुल स्वयंसहाय्य गटातर्फे महिला सहाय्य दिनानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले

.

गणेश गुरुकुलच्या सभागृहत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. स्वरूपा नानोडकर तसेच सौ. आरती टोपले, शिल्पा नायक, पार्सेकर ताई व्यासपीठावर उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त स्वरूपा नानोडकर यांनी महिलांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नावर चर्चा मार्गदर्शन केले.
गेल्या वीस वर्षापासून गणेश गुरुकुलच्या माध्यमातून लहानमुलासाठी विविध कौशल्यावर प्रशिक्षण देणाऱ्या गुरुकुलच्या संचालिका सौ. सुषमा दयानंद नार्वेकर यांचा गुरुकुल स्वयंसहायगटा तर्फे सत्कार करण्यात आला. सुषमा नार्वेकर हिनी कितीतरी मुलांना संस्कार देऊन जगणं शिकवलं. कितीतरी मुलं डॉक्टर इंजिनियर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावून मोठी झाली आहेत. सुषमाताईंच्या प्रेमळ स्वभावामुळे बरीचशी मुलं त्यांना भेटण्यास येतात. आजही त्या मुलांना प्रशिक्षण देण्याचं कार्य करीत आहेत. यावेळी सुषमा नार्वेकर हिचा सत्कार करताना आपल्याला आनंद होत आहे असे उददगार गणेश गुरुकुलच्या स्वयंसहाय्य गटाच्या अध्यक्षा कल्पना साळवी यांनी काढले. या कार्यक्रमाला सुप्रिया कांदोळकर, कविता तळकर, शामल बाणावलीकर, दिक्षा मयेकर व इतर महिलांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यास विशेष श्रम घेतले. दिक्षा कांबळी यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar