विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे : डॉ. प्रदीप सरमोकादम मांद्रे हायस्कूल पालक शिक्षक संघातर्फ ‘पालक दिन’; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

.

 

आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे; त्यात टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य स्वतःच ठरवायला हवे. आपले ध्येय गाठण्यासाठी मनाची एकाग्रता टिकवून ठेवायला हवी. स्वतः स्थिरस्थावर होर्‍यासाठी भरपूर अभ्यास करायला हवा जेणेकरून आपल्याला अनेक संधी प्राप्त होतील. म्हणूनच आपण आदर्श नागरिक बनण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन गोवा राज्य जैव विविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकादम यांनी केले.
मांद्रे हायस्कूलच्या पालक शिक्षक संघातर्फे आयोजित ‘पालक दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सरमोकादम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष किशोर शेटमांद्रेकर, मुख्याध्यापक विवेक बोडके, मांद्रे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत गोसावी, पदाधिकारी माधव जोशी, मनोहर पोखरे, शिवकुमार आरोलकर, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी नारायण बर्डे, सुभाष सावंत, सागर केरकर, तारा हडफडकर, शैलजा किनळेकर, नेत्रा मांद्रेकर, सचिव संदेश सावंत, शिक्षक प्रतिनिधी विश्वनाथ आजगावकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सामाजिक जीवनाचे अंग बनताना वैश्विक समस्याचा अभ्यास करायला हवा. अभ्यासातून प्रगती करताना आपले भविष्य घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे, असे डॉ. सरमोकादम म्हणाले.

पालक दिन कार्यक्रमात शालान्त परीक्षेत विशेष श्रेणी प्राप्त अंशिका दशरथ बर्डे, प्रिती प्रभाकर पालयेकर, अक्षया अविनाश गडेकर, सार्थक सागर केरकर, कृतिका बाबू किनळेकर, सिया सुनील पुर्खे, रविना राजन च्यारी, श्रेया शेखर मांजरेकर, सुदीप संदीप कांबळी, लवू उदय गावडे, अर्चिता साईनाथ नारोजी, मधुर दीपक शेटमांद्रेकर, अनिशा एकनाथ कवठणकर, वैष्णवी विद्याधर गडेकर, कौस्तुभ मच्छिंद्रनाथ कायसुकर, पियुष केशव गोवेकर, साहिल महेश किनळेकर, सानिया सुनील कोरगावकर, निखिल राजन च्यारी, अथर्व गोविंद तिळवे, स्नेहा राजन मांद्रेकर या
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दहावीतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आले. याशिवाय पालक शिक्षक संघाने महिला पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात रांगोळी स्पर्धेत उत्कर्षा कळंगुटकर – प्रथम, दिक्षिता नाईक – द्वितीय, कीर्ति गडेकर – तृतीय, प्रज्ञा नाईक आणि सायली गोवेकर उत्तेजनार्थ यांना बक्षिसे देण्यात आली.
प्राथमिक विद्यालयाच्या पालकांसाठीच्या गायन स्पर्धेत मंजिरी एस. किनळेळकर – प्रथम, देविता किनळेकर – द्वितीय, वैभवी मांद्रेकर – तृतीय, भक्ती मांद्रेकर आणि सुहाना हणजुणकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान करण्यात आली.
माध्यमिक विद्यालयाच्या पालकांसाठीच्या गायन स्पर्धेत सुप्रिया सावंत – प्रथम, पल्लवी शेटगावकर – द्वितीय, प्रिया नाईक – तृतीय, वंदना केरकर आणि संजना कोरगावकर यांना उत्तेजनार्थ बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापक विवेक बोडके यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक किशोर शेटमांद्रेकर यांनी केले. शिक्षिका शिल्पा सक्रोजी, सुचिता म्हामल, वर्षा पार्सेकर यांनी बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रनिवेदन केले. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. त्यांना सोमनाथ पार्सेकर आणि अविनाश गडेकर यांनी संगीत साथ केली. शिक्षक संदेश सावंत यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक विश्वनाथ आजगावकर यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें