हणजूण – वागातोर, शिवोली येथील किनारी भागात कर्णकर्कश संगीताचा जोर वाढला असून त्याचा त्रास येथील वयोवृद्ध, विध्यार्थी व रुग्णांना मोठ्या प्रमाणात होत असून स्थानिकांनी केलेल्या तक्रारीची दखलही घेतली जात नसल्याचे येथील नागरिक सांगतात

.

येथील किनारी भागातील काही हॉटेल्स, शॅक्स व क्लब मधून पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता दरवर्षी रेव्ह पार्ट्याचे अर्थात संगीत रजनीचे आयोजन करण्यात येते, पण त्याचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना होतो. संगीत वाजवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज लागते पण बहुतेक सर्वजण स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने कर्णकर्कश संगीत वाजवत असतात, कारण पोलिसात तक्रार करूनही कर्णकर्कश संगीत सुरू असते असे हणजूण येथील ऑस्टन डिसा यांनी सांगितले. काहीजण रात्रौ दहा पर्यत संगीत वाजवण्याची परवानगी घेतात पण पहाटे पर्यत त्यांचे कर्णकर्कश संगीत चालू असते.

कोवीड महामारीच्या नियमात शिथिलता जाहीर केल्यानंतर देशी पर्यटकांचा ओघ वाढल्याने त्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी रेव्ह पार्टी आयोजकाकडून जागोजागी बॅनर्स लावण्यात येत आहेत. शिवोली वाडी येथील एका हॉटेलात वाजणाऱ्या कर्णकर्कश संगीताचा त्रास येथील शाळेलीत मुलांना होऊ लागल्याने मुख्याध्यापक चोडणकर यांनी गेल्या आठवड्यात सर्व संबंधित यंत्रणाकडे तक्रार केली पण काहीच कारवाई झाली नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते.
हणजूण येथील एका हॉटेलात पहाटे पर्यत कर्णकर्कश संगीत चालत असल्याची तक्रार ऑस्टन डिसा यांनी दि.15 रोजी हणजूण पोलिसात दिली पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही असे त्यांनी सांगितले. वागातोर किनाऱ्यावरही काही जणांकडून बेकायदा रेव्ह पार्ट्या आयोजित केल्या जात असून त्यांचा त्रास स्थानिकांना तर होतोच पण चांगल्या पर्यटकांना सुद्धा होतो, पण तक्रार करण्यास कोणी धजावत नाही कारण आयोजकाकडून धमक्या दिल्या जातात.
होळीचे औचित्य साधून हणजूण वागातोर किनारी भागात 18, 19, 20 असे सलग तीन दिवस रेव्ह पार्ट्याचे आयोजन करण्यात आले असून दहावीच्या परीक्षा तोंडावर असल्याने पोलिसांनी बेकायदा संगीत रजनीवर कारवाई करून दिलासा द्यावा अशी मागणी पालकांकडून होत आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar