खोजुवे येथे सम्राट क्लब ऑफ हळदोणा आयोजित पतंग महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते

.

या महोत्सवाचे उदघाटन गोवा राज्य विभागीय विनोद मळीक यांच्या हस्ते आकाशात गॅस बलून सोडून करण्यात आले. या निमित्ताने पंतग तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पधेत प्रथम क्रमांक- उगम पणजीकर याला प्राप्त झाला तर आदर्श पोळे व विष्णु शिरोडकर यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त झाला. रतिक व तेजस पणजीकर यांना उतेजनाथ बक्षिसे देण्यात आली. सवैश रायकर यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष रवींद्र पणजीकर यांनी स्वागत केले. व पतंग महोत्सव आयोजन मागची भुमिका स्पष्ट केली या पारंपारिक क्रिडा खेळात पूर्वी सर्व सहभागी व्हायचे पण कालांतराने यात खंड पडला. सम्राट क्लब आपल्या परीने हा खेळ जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करते . पतंग उडवणे ही सुद्धा कला असूनसम्राट क्लब कार्याला प्रेरीत करते असे विनोद मळीक यांनी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की पुढच्या वर्षी हा पतंग महोत्सव सम्राट क्लब परिवार राज्य पातळीवर आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रकल्प अधिकारी अमित शिंदे यांनी आपल्या कुशल नियोजनाने या सोहळ्यात उभारी मिळवून दिली. यावेळी पदाधिकारी अमरनाथ पणजीकर, संतोष नाईक, मंगल हळदोणकर, नंदकुमार रायकर, प्रेमानंद केरकर, व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रमेश पणजीकर, सुभाष तोरसकर, सुबाय प्रभू, अमित शिंदे यांनी सहकार्य केले. रमाकांत अणवेकर यांनी सुत्रसंचालन केले तर सवैश रायकर यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar