समाजोन्नती महिला आघाडी तफै २० रोजी संघटनेच्या उपाध्यक्षा दित्पी कुडाळकर यांच्या निवासस्थानी मोरजी येथे सकाळी ११ वाजता महिला दिनाचे औचित्य साधून रेशमा शेटगावकर हिचा सत्कार प्रमुख पाहुणे मांद्रे मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंभू भाऊ बांदेकर, संघटनेच्या अध्यक्षा आनंदी म्हादोंळकर असतील असे सचिव रेश्मा मोरजकर यांनी कळवले आहे.