शिवोली मतदार संघातील पाणी समस्या सोडवण्याकरिता प्रयत्न सुरु-डिलायला लोबो

.

 

पाणी ही सर्वाची मूलभूत गरज आहे, शिवोली मतदार संघात पाण्याची मोठी समस्या आहे.निवडणुकीपूर्वी आपण मतदार संघातील पाण्याची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आपण आमदार झाल्यानंतर कृती करण्यास सुरवात केली. तीन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता म्हापणे यांची भेट घेऊन मतदार संघातील पाण्याची समस्या सोडवण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांनी लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सुटावा करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती शिवोली मतदार संघच्या नवनिर्वाचित आमदार डिलायला लोबो यांनी वेर्ला काणका पंचायतीत म्हापसा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहाय्य्क अभियंता, कंत्राटदार यांच्या सोबत ग्रामस्थांसमवेत घेतलेल्या बैठकीत दिली.
यावेळी वेर्ला काणकाच्या सरपंच अमिता कोरगावकर, पंचसदस्य लक्ष्मीकांत बिचोलकर, बाळा नाईक, निकोल मार्किस, आगासीयो, दिगंबर, माजी जिल्हा पंचायत सदस्य वासुदेव कोरगावकर व इतर पंचसदस्य उपस्थित होते.
पाण्याची समस्या सोडवण्याकरिता कार्यालयात बसून कामे होत नाहीत, वाडयावाड्यावर फिरून पहाणी करणे गरजेचे आहे. येथील सहाय्य्क अभियंत्यांना वाड्यावाड्यावर नेऊन तेथील नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार. सर्वात महत्वाचे म्हणजे बऱ्याच ठिकाणच्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झालेल्या आहेत, त्या बदलण्याकरिता नवीन होणाऱ्या सांबाखा च्या मंत्र्याकडे विनंती करणार असल्याचे आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें