हणजूण कायसूव पंचायतीची शेवटची ग्रामसभा रविवार दि 27 रोजी सकाळी 10 वा.पंचायत सभागृहात बोलावण्यात आली आहे

.

हणजूण कायसूव पंचायतीची शेवटची ग्रामसभा रविवार दि 27 रोजी सकाळी 10 वा.पंचायत सभागृहात बोलावण्यात आली आहे, सुमारे एक वर्षानंतर होणाऱ्या या ग्रामसभेत 2022 – 23 सालाचे अंदाजपत्रक सादर करण्यात येणार असून जर कोणाला काही प्रश्न विचारावयाचे असतील किंवा ठराव मांडावयाचे असतील तर त्यांनी ते लिखित स्वरूपात दि 23 मार्च पर्यत आणून द्यावेत असे कळवण्यात आले आहे.

हणजूण कायसूव पंचायतीच्या गेल्या पाच वर्षात फक्त पाचच सर्वसाधारण ग्रामसभा घेण्यात आल्या होत्या, शेवटची ग्रामसभा 28 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली होती. करोना महामारीमुळे त्यापूर्वी व नंतरही काही ग्रामसभा झाल्या नाहीत, तर गटविकास अधिकाऱ्यांनी 21 नोव्हेंबर व 26 डिसेंबर 2022 रोजी आदेश देऊनही सरपंच सावियो अल्मेदा यांनी ग्रामसभा घेण्याचे टाळले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar