कायसूव शापोरा येथे ब्रम्हीभुत परमहंस श्री स्वामी अच्युतानंद महाराज यांची 83 वी पुण्यतिथी व शिशिरोत्सव शुक्रवार दि.25 मार्च 2022 ते शनिवार दि.2 एप्रिल 2022 पर्यत विविध कार्यक्रमानिशी साजरी होणार आहे

.

कायसूव शापोरा येथे ब्रम्हीभुत परमहंस श्री स्वामी अच्युतानंद महाराज यांची 83 वी पुण्यतिथी व शिशिरोत्सव शुक्रवार दि.25 मार्च 2022 ते शनिवार दि.2 एप्रिल 2022 पर्यत विविध कार्यक्रमानिशी साजरी होणार आहे.त्यानंतर 13 एप्रिल 2022 रोजी व 14 एप्रिल 2022 रोजी श्री सिद्धेश्वर पंचायतन देवतांचा 30 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.
शुक्रवार दि.25 मार्च रोजी सकाळी 7 वा. श्री स्वामी अच्युतानंद महाराजांच्या तसबिरीची पालखीतून वादनासह गावातून भव्य मिरवणूक.शनिवार दि.26 मार्च रोजी स्वामींजींची 83 वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. त्या प्रित्यर्थ सकाळी स्वामीजीच्या मूर्तीवर महाभिषेक, राजोपचार पूजा, लघुरुद्र, आरती तसेच दुपारी फळफळावळीची पावणी, सायं. समाराधना व रात्रौ भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
रविवार दि.27 रोजी रात्रौ 7 वा. घुमटवादन, रात्रौ 8.30 वा. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर आधारित ” गीतरामायण ” हा बहारदार कर्यक्रम सादर होईल. सोमवार दि.28 रोजी रात्रौ 10 वा. दाभोलवाडेकरातर्फे संगीत सामाजिक तीन अंकी नाटक ” अखंड नाते रक्ताचे ” मंगळवार दि.29 रोजी 10 वा. हुडोवाडेकरतर्फे विनोदी दोन अंकी कोकणी नाटक ” फिर भी दिल है मर्दोवाला “, बुधवार दि.30 मार्च रोजी रात्रौ 10 वा. वळकर झरकर वाडेकरातर्फे दोन अंकी कोकणी नाटक ” आता करपाचे किदे ” गुरवार दि.31 रोजी रात्रौ 10 वा. बंदीर वाडेकरातर्फे विनोदी दोन अंकी कोकणी नाटक ” प्रेम पिशे ” शुक्रवार दि.1 एप्रिल रोजी रात्रौ 10 वा. बादेवाडेकरतर्फे धमाल विनोदी दोन अंकी कोकणी नाटक ” मोग तुझो माझो ” शनिवार दि.2 एप्रिल रोजी दुपारी 3 वा धुलीवदंवाने कार्यक्रमांची सांगता होईल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar