शिवोली मतदार संघात भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी सततचा पाठपुरावा करण्याची गरज आहे, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी थोडा विलंब लागेल पण येत्या काही दिवसात पाणी, वीज अश्या मूलभूत समस्या सुटतील व पुढील निवडणुकीपूर्वी पाणी व विज आणी रस्ते हा विषय आपल्या जाहीरनाम्यात नसेल असे आश्वासन शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी आसगाव येथे दिले

.

 

आसगाव पंचायतगृहात ग्रामस्थांच्या पाणी समस्या जाणून घेण्यासाठी पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्यासोबत आमदार डिलायला लोबो यांनी बैठक बोलावली होती. यावेळी असगावचे सरपंच हनुमंत नाईक, उपसरपंच रिया नाईक, पंचसदस्य सागर नाईक, कार्तिक केळकर, जोकीम कारदोझ, अभियंते बोरकर, अभियंते तनय उपस्थित होते.
यावेळी येथील ग्रामस्थांनी प्रभागवार आपल्या समस्या मांडून त्याची सोडवणूक करण्याची मागणी केली तर काहीजणांनी उपाययोजना सुचवल्या.बुधवार पासून पंचायत क्षेत्रातील प्रभागात फिरून समस्या सोडवण्याकरिता पहाणी करणार असल्याचे आश्वासन अभियंता बोरकर यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar