राज्यात सरकार अद्याप स्थापन झालेले नाही तसेच शासकीय यंत्रणा ठप्प झाल्याची संधी साधत मायणा-सडयें येथील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी चालली असून याभागात आतापर्यंत शेकडों झाडांची कत्तल करण्यात येत आहे

.

चोवीस तासाच्या आत स्थानिक पंचायत तसेच संबंधित खात्याकडून ही डोंगरकापणी बंद न केल्यास गांवकऱ्यासह रस्त्यावर उतरण्याचा गर्भीत इशारा उमेश केरकर यांनी दिला आहे, सडयें पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक 247/1 येथील डोंगरमाथ्यावर नागरी वस्तीपासून दुरवर असलेल्या वनक्षेत्रात गेल्या डिसेंबर महिन्यापासून हा प्रकार चालला होता परंतु राज्यातील निवडणुकांच्या गदारोळात दंग असलेल्या गांवकऱ्यांचे या गोष्टीकडे वेळीच लक्ष न गेल्याने आतापर्यंत डोंगराचा अर्धा अधिक जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते उमेश केरकर यांनी दिली.
सडयें पंचायत क्षेत्रातील जैव संवर्धन समितीचे अध्यक्ष पीटर डिसौझा यांनी येथील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक झऱ्याचे पाणी उपलब्ध असल्याने देशी विदेशी पक्षांचे थव्याचे थवे वर्षाच्या बाराही महिने ठाण मांडून बसत असल्याचे सांगितले, परंतु डिसेंबर महिन्यापासून याभागात चाललेल्या डोंगरकापणीसाठी मोठमोठ्या मशीन्स कार्यरत असल्याने बहुतेक पक्षांनी स्थलांतर केल्याचे सांगितले. राज्यातील सरकार एकाबाजूने जैव संवर्धनाचे संरक्षण करण्याच्या गोष्टी करत आहे तर दुसऱ्या बाजूने जैव संवर्धनाचा विनाश करण्यासाठी परप्रांतीय बिल्डरांना अभय देण्याचे काम करत असल्याचा आरोप डिसौझा यांनी केला आहे.
सामान्य माणसांसाठी एक न्याय तर गर्भश्रीमंत बिल्डरांसाठी दुसरा ही तफावत यापुढे स्थानिक ग्रांमस्थ कदापि सहन करणार नसल्याचे केरकर यांनी सांगितले. दरम्यान, मायणा सडयेंत चाललेल्या डोंगरकापणीस एका पंथाच्या स्थानिक धर्मगुरुंनीही जोरदार आक्षेप घेतला असून खुलेआम चाललेली मायणा-सडयेंतील डोंगरकापणी तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी केली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar