आपले आरोग्य चांगले राहिले तर पैसा बक्कळ कमवता येतो परंतु आजच्या युगात पैसा कामावण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे हे घातक आहे असे सांगून “आरोग्यम धनसंपदा ” या म्हणीचा दाखला देत स्वताबरोबरच इतरांच्याही आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे आवाहन म्हापसा नगरपालिकेच्या नगरसेविका तसेच सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य डॉ. नुतन बिचोलकर यांनी शिवोली येथे केले.
शिवोलीतील स्वामी समर्थ मठ तसेच स्थानिक आरोग्य केद्राच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी मठाच्या प्रांगणात आयोजित विशेष आरोग्य शिबीरात प्रमुख पाहुण्या या नात्याने डॉ. बिचोलकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर, डॉ. उमाली रोहिदास, डॉ. श्रुती शेट नार्वेकर, अजीत च्यारी, दत्ताराम बिचोलकर तसेच समर्थन संघटणेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर, यदुवीर सिमेपुरुषकर, ह्रुतिक आगरवाडेकर, अमीत मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मठाचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात येथील स्वामींचा मठ हा धार्मीक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक उपक्रमांचा श संगम असलेले बहुजन हीताय असे संस्कारी केद्र असल्याचे सांगितले तसेच येथील उपक्रमांचा शिवोलीबरोबरच उत्तर गोव्यातील सर्वसामान्य जनता घेत असल्याचे सांगितले.
यावेळी, डॉ. उमाली रोहिदास तसेच डॉ. श्रुती शेट नार्वेकर यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. रुग्णांच्या सामान्य शारिरीक चिकित्सेपासून ते दंत चिकित्सा, आणि आयुर्वेदापासून ते नेत्रचिकित्सा विविध तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते करण्यात आली. गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे ऐंशी रुग्णांनी या विशेष शिबीराचा लाभ घेतला. शिवोली आरोग्य केद्राच्या डॉ. उमाली रोहिदास, डॉ. अमीना पत्रे (आयुर्वेद ) डॉ. रेश्मा लोटलीकर (दंत चिकित्सक ) डॉ. श्रुती शेट नार्वेकर, नुतन पाळणी, अजीत च्यारी आदींनी भाग घेतला.