बार्देशातील टेलिफोन वाजेना बिलेमात्र भरमसाठ

.

बार्देश तालुक्यातील भारतीय संचयनी निगम लिमिटेड (bsnl)ची सेवा गेल्या वर्षभरापासून बिन भरवशाची झालेली आहे. म्हापसा कार्यालयातील अभियंते कर्मचारी वर्ग याच्या निसक्रियतेमुळे अनेकांच्या दुकानातील, घरातील व अस्थापनातील फोन बंद पडलेले आहेत. परंतु दर महा टेलिफोनची बिले मात्र न चुकता येतात त्यामुळे ग्राहकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
फोन बिघडल्याची अनेक वेळा तक्रारी फोनवरून, कार्यालयात जाऊन व लिहून देऊनही त्यावर म्हापसा कार्यालयातील अभियंते व कर्मचारी त्यांची दखल घेत नाहीत. म्हापसा कार्यालयातील अभियंते सकाळी अकरावाजेपर्यंत कार्यालयात पोहचत नाही. आणि ज्या तक्रारी दिलेल्या असतात त्याकडे पाहत नसल्याचे दिसून आले.
म्हापसा कार्यालयातील कर्मचारी दिवसभर बसून आराम करत असतात. पण ते आलेल्या तक्रारीकडे डोळे झाक करतात. फोन चालू नसताना बिले कशी येतात. यांचा उलगडा टेलिफोन ग्राहकांना होत नाही विनाकारण ग्राहक हजारो रुपये बिलादोरे भरतात. तसेच कार्यालयात जाऊन फोन दुरुस्ती करण्यास सांगितले असता अनेकांना सांगितले जाते की फोन दुरुस्ती होणार नाही केबल खराब झालेला आहे.
खराब झालेला केबल बदलण्यास या कर्मचाऱ्यांना होत नाही त्यामुळे अश्या कर्मचाऱ्यांची बदली रत्र करावी व एकाच जागी वर्षओनी वर्ष बसून राहून घर जावई झालेल्या अभियंत्यांनाही दुसरीकडे पाठवण्याची पाणी टेलिफोन ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar