समाजोन्नती संघटनेचे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर, श्री विष्ण कला सांस्कृतिक संस्थचे अध्यक्ष दामोदर कुडाळकर,. आघाडीच्या अध्यक्षा आनंदी म्हादोंळकर आदी उपस्थित होत्या.
शंभू भाऊ बांदेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की आजच्या महिला शिक्षणा बरोबर कला जोपासून आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना योग्य दिशा देण्याचे काम करत आहे. शहरी महिलांना कला जोपासणासाठी कला दालने उपलब्ध असतात पण रेशमासारखा मोरजी गावात राहून, संपूर्ण गोवाभर भजन, फुगडी, घुमटी आरती सारखे कार्यक्रम करतात. विधवेचे जीवन कंठीत असताना त्यांनी आपल्यातील कलाकार मरू दिला नाही. दामोदर कुडाळकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. आपले मनोगत व्यक्त करताना रेशमा यांनी सांगितले की मी माझ्या तील कलाकार कधीच ओळखला नव्हता, कलेची आवड खूप होती. म्हणून च इतर महिलांना घेऊन पुढे जाऊ शकले. कला जोपासतान निंदा नालस्ती खूप सोसावी लागली पण आपण डगमगले नाही.यावेळी शंभू बांदेकर यांनी रेशमा याचा श्री फळ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्वागत दिपती कुडाळकर यांनी स्वागत केले परीचय नेहा कुडाळकर यांनी केला. सुत्रसंचालन धृव कुडाळकर तर आनंदी म्हादोंळकर यांनी आभार मानले.
समाजोन्नती महिला आघाडी तफै मोरजी येथे दीप्ती कुडाळकर यांच्या निवासस्थानी महिला दिनाचे औचित्य साधून रेशमा शेटगांवकर यांचा सत्कार करण्यात आला

.
[ays_slider id=1]