शापोरा, हणजूण येथील श्री स्वामी अच्युतानंद महाराजांच्या 83 व्या पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी अच्युतानंदांच्या तसबिरीची गावातून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी उत्सवात श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री स्वामी अच्युतानंद महाराजांची पुण्यतिथी म्हणजे या गावचा मोठा उत्सव, महाराजांची पुण्यतिथी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते, महाप्रसादाला संपूर्ण गोव्यातून भक्तगण येतात, यंदा 83 वी पुण्यतिथी असून सर्व भक्तांनी पुण्यतिथीला यावे असे आवाहन करून पुण्यतिथी नंतर शिशिरोत्सवानिमित्त येथील पाच वाडेकरातर्फे नाटक सादर करण्यात येणार आहेत असे देवस्थान समितीचे अध्यक्ष जयदेव शिरोडकर यांनी सांगितले.